स्पेशल रिपोर्ट : ‘राजीव गांधींमुळे मी जिवंत’, असं म्हणणाऱ्या वाजपेयींचा वारसा मोदी विसरले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कमालीचा काँग्रेसद्वेष एव्हाना जगभर पोहोचला आहे. मात्र, मोदींचा काँग्रेसद्वेष आता टोकाला पोहोचला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याचे कारण पंतप्रधान मोदींनी देशासाठी बलिदान देणाऱ्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे राजकारणासह सामाजिक, वैचारिक अशा सर्वच प्रांतांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. याच दरम्यान, अनेकजण […]

स्पेशल रिपोर्ट : 'राजीव गांधींमुळे मी जिवंत', असं म्हणणाऱ्या वाजपेयींचा वारसा मोदी विसरले?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कमालीचा काँग्रेसद्वेष एव्हाना जगभर पोहोचला आहे. मात्र, मोदींचा काँग्रेसद्वेष आता टोकाला पोहोचला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याचे कारण पंतप्रधान मोदींनी देशासाठी बलिदान देणाऱ्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे राजकारणासह सामाजिक, वैचारिक अशा सर्वच प्रांतांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. याच दरम्यान, अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका प्रसंगाची आठवण करुन देत आहेत.

“मी आज केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच जिवंत आहे” असे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी 1991 साली म्हणाले होते. ते का म्हणाले होते आणि त्यांच्या त्या वक्तव्याची आताच का आठवण व्हावी? तर पंतप्रधान मोदींनी राजीव गांधी यांच्यावर केलेली टीकेमुळे त्या प्रसंगाची आठवण होते.

“तुमच्या वडिलांना इतर देशांनी जरी क्लीन चिट दिली असली, तरी त्यांच आयुष्य भ्रष्टाचारी म्हणूनच संपलं. ‘मिस्टर क्लीन’ असा कार्यकाळ मिरवणाऱ्या तुमच्या वडिलांचा शेवट ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणूनच झाला.” असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे केले.

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काँग्रेस, गांधी कुटुंब यांच्याबद्दल टोकाचा द्वेष आहे. मात्र, त्यांना आज त्यांच्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचेच माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या विधानाची आम्ही आठवण करुन देत, एकाच पक्षाच्या दोन पंतप्रधानांची राजीव गांधी यांच्याबद्दल मतं सांगणार आहोत.

अटलबिहारी वाजपेयी हे राजीव गांधींबद्दल काय म्हणाले होते?

1991 साली भारतरत्न राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी हे संसदेत विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांना एका वरिष्ठ पत्रकाराने राजीव गांधींबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी भावनाविवश होत अटलबिहारी वाजपेयी म्हणाले, “मी आज केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच जिवंत आहे”.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजीव गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्यामागची गोष्ट अशीय की, 1984-1989 या काळात राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते. याच दरम्यान भाजपचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी किडनीच्या आजाराने त्रस्त होते. शिवाय, त्या आजारावर भारतात उत्तम उपचार शक्य नव्हते, मग उपचारासाठी परदेशात जाणं आवश्यक होतं. मात्र, वाजपेयी यांची परदेशात जाऊन उपचार घेण्याएवढी आर्थिक क्षमता नव्हती.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या किडनी आजाराची आणि त्यावरील उपचाराची गोष्टी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कानावर आली. एक दिवस राजीव गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना आपल्या कार्यालयात बोलावले आणि सांगितले की, “भारताचे एक प्रतिनिधी मंडळ संयुक्त राष्ट्रात जाणार आहे. तुम्हीही त्यांच्यासोबत जा आणि याच संधीचा फायदा घेत, न्यूयॉर्कमध्ये आजारावर उपचारही करा.”

या प्रसंगाची अटलबिहारी वाजपेयी जेव्हा जेव्हा आठवण काढत, त्यावेळी ते भावनाविवश होत आणि म्हणत, “मी आज केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच जिवंत आहे”

विशेष म्हणजे, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यात कायमच वैचारिक विरोध राहिला. मात्र, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप त्यांनी टाळले. किंबहुना, एकमेकांना केलेली वैयक्तिक मदतही राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी इतरांना सांगितली नाही. स्वच्छ मनाचे राजकीय नेते आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणूनच या दोघांकडे कायम पाहिले गेले.

राजीव गांधी-वाजपेयी यांच्या प्रसंगाची आज आठवण का?

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही भाजपचेच नेते आहेत. म्हणजेच, ज्या पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी हे होते. मात्र, दोन्ही नेत्यांमधील राजकीय सुसंस्कृतपणात मोठा फरक वरील प्रसंगातून जाणवतो. याचे कारण, कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले, “तुमच्या वडिलांना इतर देशांनी जरी क्लीन चिट दिली असली, तरी त्यांच आयुष्य भ्रष्टाचारी म्हणूनच संपलं. ‘मिस्टर क्लीन’ असा कार्यकाळ मिरवणाऱ्या तुमच्या वडिलांचा शेवट ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणूनच झाला.”

मोदींच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांच्याकडून काय प्रतिक्रिया?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर, काँग्रेससह देशभरातून मोदींवर टीका सुरु झाली आहे. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घाईघाईने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. अखेर त्यांनी मोदींना उद्देशून ट्वीट केले आणि सौम्य शब्दात सांगितले, “मोदीजी, लढाई आता संपलीय. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. माझ्या वडिलांवर टीका करुनही तुम्ही आता वाचू शकत नाहीत. All my love and a huge hug.”

एकीकडे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी यांच्यातील राजकारणापलिकडचं नातं आणि दुसरीकडे वाजपेयींच्याच पक्षातील विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजीव गांधी यांच्याबद्दलचं वक्तव्य, हे राजकीय संस्कृती स्पष्टपणे दाखवून देते. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या वडिलांवर मोदींनी केलेल्या टीकेला अत्यंत सौम्य शब्दात उत्तर दिले आहे. एकंदरीत पंतप्रधान मोदींच्या कमालीच्या काँग्रेसद्वेषामुळे त्यांनी टीका करताना भारतासाठी बलिदान देणाऱ्या भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्यावरही टीका करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. आता निवडणुकीच्या प्रचारात अशी वक्तव्य माफ होऊन जातील की मतपेटीतून जनता अशा वक्तव्यांना उत्तर देईल, हे येणाऱ्या काळात कळेलच.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.