बीडमध्ये संचारबंदीवरुन पोलीस-नागरिकांमध्ये हाणामारी

संचारबंदीवरुन बीडच्या शिरसाळा येथील पवार गल्लीत पोलीस आणि नागरिक यांच्यात हाणामारी झाली (Dispute between Police and Civilians).

Dispute between Police and Civilians, बीडमध्ये संचारबंदीवरुन पोलीस-नागरिकांमध्ये हाणामारी

बीड : राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे (Dispute between Police and Civilians). संचारबंदीदरम्यान नागरिकांनी रस्त्यावर उतरु नये, संसर्ग टाळावा यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अखेर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. मात्र, या कारवाईतून बीडच्या शिरसाळा येथील पवार गल्लीत पोलीस आणि नागरिक यांच्यात हाणामारी झाली (Dispute between Police and Civilians).

पवार गल्लीत संध्याकाळी रस्त्यावर काही लोक जमली होती. त्यावेळी पोलीस तिथे पोहोचली. पोलिसांनी त्यांना रस्त्यावर उभं राहण्यामागचं कारण विचारलं. यातूनचं पोलीस आणि नागरिक यांच्यात वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं.

पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केल्यानंतर संतप्त नागरिकांनीही पोलिसांवर हल्ला चढवला. या हाणामारीत महिलांनादेखील मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात तणावाचं वातावरण आहे.

दरम्यान, या घटनेवर गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. माझी लोकांना विनंती आहे की, पोलिसांनाही समजून घ्या. कारण पोलीस घरदार सोडून ड्यूटी करत आहेत. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं. सर्व नियम पाळले तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. काही तक्रार असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करावी. पोलिसांची बाजू समजून घेणं जरुरीचं आहे.”, असं सतेज पाटील म्हणाले.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची म्हणजेच संचारबंदीची घोषणा केली आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. तो प्रचंड वेगाने पसरत आहे. या रोगाला नष्ट करण्यासाठी सरकारने संचारबंदीचा कठोर निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

घरातून बाहेर पडल्यास गोळी मारण्याचे आदेश देऊ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा कठोर इशारा

80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Corona | नवरा-नवरी लॉकडाऊन, कोरोनामुळे ऑनलाईन विवाह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *