वाहन तपासल्याने रावतेंचा संताप, निवडणूक कर्मचार्‍यांशी शाब्दिक चकमक

निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वत्र वाहनांची तपासणी (Diwakar Raote Vehicle checking in Election) केली जाते. यात अगदी व्हीआयपींच्या वाहनांचाही समावेश असतो. मात्र, व्हीआयपींच्या वाहनाची तपासणी करताना अनेक व्हीआयपींचा अहंकार दुखावला जात असल्याचंही पाहायला मिळतं.

वाहन तपासल्याने रावतेंचा संताप, निवडणूक कर्मचार्‍यांशी शाब्दिक चकमक
Follow us
| Updated on: Oct 16, 2019 | 11:45 PM

वर्धा : निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वत्र वाहनांची तपासणी (Diwakar Raote Vehicle checking in Election) केली जाते. यात अगदी व्हीआयपींच्या वाहनांचाही समावेश असतो. मात्र, व्हीआयपींच्या वाहनाची तपासणी करताना अनेक व्हीआयपींचा अहंकार दुखावला जात असल्याचंही पाहायला मिळतं. यातून मग तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच डोकेदुखी वाढते. असाच प्रकार वर्ध्यात घडला. परिवहन मंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote Vehicle checking in Election) यांच्या वाहनाची वर्ध्याच्या पूलगाव येथे तपासणी करण्यात आली. मात्र, यावर संतापून रावतेंनी वाहन तपासणी करणाऱ्यांना कर्मचार्‍यांशीच शाब्दिक बाचाबाची केली. याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

परिवहन मंत्री आणि शिवेसना नेते दिवाकर रावते मंगळवारी (15 ऑक्टोबर) सायंकाळी सव्वाचार वाजताच्या सुमारास वर्ध्यातील पुलगाव येथे सभेसाठी आले होते. यावेळी पुलगावमधील राम मंदिराजवळ स्थिर तपासणी पथक वाहनांची तपासणी करत होते. त्यांनी इतर वाहनांप्रमाणेच रावते यांच्या वाहनाचीही तपासणी केली. मात्र, वाहनाभोवती कॅमेरा फिरवत वाहनाची डिक्की तपासली असता रावते संतापले. रावतेंनी यावर आक्षेप घेत आपल्या मंत्रीपदाचा रुबाब दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी ते निवडणूक आयोगाचे निर्देश सोयीस्करपणे विसरले.

रावते यांनी मी कोण हे तुम्हाला माहित नाही काय? असं म्हणत कर्मचाऱ्यांशीच वाद घातला. तसेच वाहनातील काही बॅग फेकल्या. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही जणांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्नही केला मात्र, त्यांना तो व्हिडीओ डिलीट करण्यास भाग पाडण्यात आलं.

संबंधित बाब निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसह वरिष्ठांना आणि पोलिसांनाही कळवण्यात आली. त्यानंतर निवडणूक अधिकार्‍यांनी कणखर भूमिका घेत तपासणी केली. त्यानंतरच दिवाकर रावतेंचं वाहन पुढे सोडण्यात आलं. पोलिसांनी संबंधित घटनेची नोंद घेतल्याचंही सांगितलं. अधिकार्‍यांनी आता हा वाद गैरसमजातून झाल्याचं कारण पुढे केलं आहे.

या घटनेमुळं पुन्हा एकदा सर्वांसाठी असलेल्या नियमांमध्ये मंत्र्यांना सुट हवी असल्याचा प्रत्यय आला आहे. निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य असल्याचा आव आणणारे हे मंत्री नियम पाळण्याच्या वेळी मात्र अचानक विशेष होऊन आपल्या पदाचा रुबाब दाखवू लागतात. यावर प्रशासन काय कारवाई घेणार, निवडणूक आयोग याची दखल काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.