ट्रम्प यांच्या भाषणात बॉलिवूडचा उल्लेख, 'शोले' आणि 'डीडीएलजे'चं कौतुक

ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणादरम्यान शाहरुख खान-काजोलच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे' या सिनेमाचा उल्लेख केला.

ट्रम्प यांच्या भाषणात बॉलिवूडचा उल्लेख, 'शोले' आणि 'डीडीएलजे'चं कौतुक

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर (Donald Trump India Visit) आहेत. यादरम्यान, (Donald Trump On Bollywood)डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठं स्टेडियम ‘मोटेरा’ येथे ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात भारतीयांना संबोधित केलं. यावेळी, ट्रम्प यांनी बॉलिवूड सिनेमांचंही तोंडभरुन कौतुक केलं. त्यांनी शाहरुख खान-काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या सिनेमाचा उल्लेख केला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “भारतीय सिनेसृष्टी खूप मोठी आहे. इथे दरवर्षी (Donald Trump On Bollywood) जवळपास दोन हजार सिनेमे तयार होतात. इथल्या सिनेमांमध्ये भांगडा आणि संगीत उत्कृष्ट असतो”. तसेच, ट्रम्प यांनी शाहरुख खान आणि काजोलचा लोकप्रिय सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ आणि ऐतिहासिक अशा ‘शोले’ सिनेमाचंही कौतुक केलं.

शिवाय, त्यांनी भारतीय खेळाडूंचंही कौतुक केलं. भारताने जगाला सचिन तेंडूलकर, विराट कोहली सारखे बडे खेळाडू दिले, असंही ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला सकाली 12 वाजताच्या जवळपास अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे साबरमती आश्रमात गेले. त्यानंतर त्यांनी मोटेरा स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमादरम्यान भारतीयांना (Donald Trump On Bollywood) संबोधित केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *