पंक्चर काढताना व्होल्वोने उडवलं, पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरला वाढदिवशीच काळाने गाठलं

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध संचेती रुग्णालयातील डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर (Dr Ketan Khurjekar Dies) यांचं पुणे-मुंबई महामार्गावर बसच्या धडकेत निधन झालं. दुर्दैवी योगायोग म्हणजे वाढदिवशीच डॉ. खुर्जेकर (Dr Ketan Khurjekar Dies) यांच्यावर काळाने घाला घातला. डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर हे संचेती रुग्णालयातील अस्थीरोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. काल (रविवार 15 सप्टेंबर) रात्री अकरा वाजताच्या […]

पंक्चर काढताना व्होल्वोने उडवलं, पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरला वाढदिवशीच काळाने गाठलं
Follow us
| Updated on: Sep 16, 2019 | 11:41 AM

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध संचेती रुग्णालयातील डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर (Dr Ketan Khurjekar Dies) यांचं पुणे-मुंबई महामार्गावर बसच्या धडकेत निधन झालं. दुर्दैवी योगायोग म्हणजे वाढदिवशीच डॉ. खुर्जेकर (Dr Ketan Khurjekar Dies) यांच्यावर काळाने घाला घातला.

डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर हे संचेती रुग्णालयातील अस्थीरोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. काल (रविवार 15 सप्टेंबर) रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होते. मात्र पुणे-मुंबई महामार्गावर गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे कार कडेला थांबवण्यात आली होती.

एक्स्प्रेस वे वर तळेगावजवळ रस्त्याच्या बाजूला टायरचं पंक्चर काढण्यासाठी डॉ. खुर्जेकर कारचालकाला मदत करत होते. त्याचवेळी मागून आलेल्या व्होल्व्हो बसने कारसह खुर्जेकर आणि त्यांच्या चालकाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की खुर्जेकरांच्या गाडीचा चक्काचूर झाला. तर डॉक्टर आणि ड्रायव्हर या दोघांचा जागीच मृत्यू (Dr Ketan Khurjekar Dies) झाला.

गुजरात पोलिसांची लोणावळ्यात येऊन कारवाई, स्थानिक पोलीस अनभिज्ञ

अपघातात प्रमोद भिल्लारे आणि जयेश पवार हे निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबईहून मेडिकल कॉन्फरन्सहून परतताना हा अपघात घडला.

डॉ. केतन खुर्जेकर हे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचे चिरंजीव होते. दुर्दैवी योगायोग म्हणजे केतन यांचा आज वाढदिवस होता. पण या आनंदाच्या दिवशीच खुर्जेकर कुटुंबावर मोठा आघात झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यानेही डॉ. खुर्जेकरांच्या निधनाबद्दल फेसबुकवरुन शोक व्यक्त केला आहे. ‘मागच्या आठवड्यात माझ्या भावाचा आणि काल माझ्या डॉक्टर असलेल्या मित्राचा रस्त्यावरच्या अपघातात जीव गेला. कारण तेच खड्डे, बेशिस्तपणा, निष्काळजीपणा आणि देशाच्या वाहतुकीचे नियम न पाळता जीव घेणारे छुपे दहशतवादी.’ अशा शब्दात सुबोध भावेने राग व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.