SSC Board exam postponed | दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात  (10th SSC Board exam postponed) आला आहे.

SSC Board exam postponed | दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात  (SSC Board exam postponed) आला आहे. 23 मार्चला होणारा भूगोल विषयाचा पेपर आता 31 मार्चनंतर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतचा निर्णय घेतला. याआधी पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी कालच जाहीर केला होता. (SSC Board exam postponed)

इयत्ता 10 वी परीक्षेचा सोमवार दिनांक 23 मार्च रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला आहे . रद्द करण्यात आलेल्या पेपरची पुढील तारीख 31 मार्च नंतर जाहीर करण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

“नियोजित वेळापत्रकानुसार, दहावी बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर 23 मार्चला होता. मात्र सध्याची परस्थिती पाहता, हा पेपर 31 मार्चनंतर घेण्यात येईल” असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दहावी बोर्डाचा शेवटचा पेपर राहिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला 3 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत ही परीक्षा नियोजित होती. मात्र राज्यात कोरोनाचं थैमान पाहता, शेवटचा पेपर लांबणीवर टाकला आहे.

पहिली ते आठवी परीक्षा रद्द

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.  तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार आहे. वर्षा गायकवाड यांनी कालच हा निर्णय जाहीर केला होता.

दहावीचे विद्यार्थी

यंदा राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 65 हजार परीक्षार्थींची वाढ आहे. तर 80 उपद्रवी केंद्र असून नाशिक विभागात सर्वाधिक आहेत.

कोणकोणत्या परीक्षा रद्द/पुढे ढकलल्या?

  • पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द
  • नववी ते अकरावी  – 15 एप्रिलनंतर परीक्षा
  • दहावीचा शेवटचा पेपर 31 मार्चनंतर
  • पेपर तपासणी 31 मार्चपर्यंत सध्या तरी थांबवण्यात येईल
  • पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गुण संकलन करुन निकाल दिला जाईल
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम (दहावी वगळून)

संबंधित बातम्या 

पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *