भोपाळमधील डमी उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज मागे

मुंबई : मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदारसंघात डमी उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र या प्रज्ञा ठाकूर भाजपच्या उमेदवार नसून अपक्ष उमेदवार आहेत. भोपाळ मतदारसंघात एकाच नावाच्या दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे याचा फटका भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना बसला असता. मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघात भाजपकडून प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी […]

भोपाळमधील डमी उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज मागे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई : मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदारसंघात डमी उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र या प्रज्ञा ठाकूर भाजपच्या उमेदवार नसून अपक्ष उमेदवार आहेत. भोपाळ मतदारसंघात एकाच नावाच्या दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे याचा फटका भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना बसला असता.

मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघात भाजपकडून प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. पण याच मतदारसंघात प्रज्ञा ठाकूर नावाचा आणखी एक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे.

एकाच नावाच्या दोन व्यक्ती निवडणूक रिंगणात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात होती. तसेच मतदार दोन्ही नावाच्या गोंधळात प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांच्या नावासमोरील बटन दाबतील अशी भीती भाजपला वाटत होती.

हा गोंधळ दूर करण्यासाठी भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्वत: अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली. अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपच्या प्रज्ञा ठाकूर यांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.