पालघरमध्ये 6 भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री 1 वाजून 3 मिनिटांनी जोरदार भूकंपाचे धक्के बसले. डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाडपर्यंत या भूकंपाचे जोरदार धक्के बसले.

, पालघरमध्ये 6 भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर : जिल्ह्यातील भूकंपाचे सत्र सुरुच आहे. बुधवारी मध्यरात्री 1 वाजून 3 मिनिटांनी जोरदार भूकंपाचे धक्के बसले. डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, दापचरी, वेवजी ते पालघरसह गुजरात राज्यातील वलसाडपर्यंत या भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यातील 1 वाजून 3 मिनिटांचा धक्का सर्वाधिक क्षमतेचा  धक्का 4.08 रिस्टर स्केलचा होता.

भूकंपाचे धक्क्यांची तीव्र जास्त असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. रात्री अनुक्रमे 9 वाजून 49 मिनिटांनी 2.4 रिस्टर स्केल, 12 वाजून 33 मिनिटांनी 2.2 रिस्टर स्केल, 12 वाजून 36  मिनिटांनी 1.9 रिस्टर स्केल, तर 1 वाजून 3 मिनिटांनी 4.8 रिस्टर स्केलचा धक्का बसला. त्यानंतर पुन्हा 1 वाजून 6 मिनिटांनी आणि 1 वाजून 12 मिनिटांनी जोरदार धक्के जाणवले. मात्र, त्याची रिस्टर स्केल क्षमता अद्याप समजू शकलेली नाही.

दरम्यान, याआधी अनेकदा पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात मागील मोठ्या काळापासून भूकंपाचे लहान-मोठे धक्के बसत होते. हा परिसर भाग भूकंप प्रवण क्षेत्र-3 मध्ये येतो. या भागात 25 डिसेंबर 2017 आणि जव्हार तालुक्यात वाळवंडा भागामध्ये 2 जानेवारी 2018 रोजीही भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. तेथे भूकंप मापन यंत्रही बसवण्यात आले होते. भूगर्भतज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकाने धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल इथे प्राथमिक स्वरुपात 3 महिन्यांसाठी भूकंपमापन यंत्र बसवलं होतं. मात्र भूकंपाचे सत्र कायम राहिल्यास कायमस्वरुपी यंत्र बसविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *