ICICI बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा दणका

ICICI बँकेच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केली आहे.

ICICI बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा दणका
Follow us
| Updated on: Jan 10, 2020 | 5:55 PM

मुंबई : ICICI बँकेच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये त्यांचे मुंबईतील फ्लॅट्स आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 78 कोटी असल्याची माहिती आहे. चंदा कोचर यांच्याविरोधात 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेल्या 3,250 कोटींच्या कर्जाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

ICICI बँकेची कर्जदार कंपनी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजद्वारे कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूकिबाबत घोटळ्याच्या आरोपांनंतर ऑक्टोबर 2018 मध्ये चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बँकेकडून चंदा कोचर यांची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. याबाबत चंदा कोचर यांनी काही दिवसांपूर्वी बँकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. 2018 मध्ये जेव्हा चंदा कोचरने राजीनामा दिला होता, तेव्हा बँकेने तो स्वीकार केला होता. त्या राजीनाम्याला वैध मानले जावे, अशी मागणी चंदा कोचर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

यापूर्वी 4 ऑक्टोबर 2019 ला चंदा कोचर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बँकेने निश्चित कालावधीपूर्वीच पद सोडण्याची मागणी मान्य करत संदीप बक्षी यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली होती.

काय आहे प्रकरण?

व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात 20 बँकांकडून घेतलं होतं. 2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असाही आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे.

ED seized the properties of Chanda Kochhar

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.