Mera Angan Mera Ranangan | भाजपच्या आंदोलनाबाबत अखेर एकनाथ खडसेंची भूमिका जाहीर

राज्यातील बिघडलेल्या वैद्यकीय व्यवस्थेचा आरोप करुन, बारा बलुतेदारांच्या मदतीसाठी भाजपने आज आंदोलन पुकारलं. (BJP Mera Angan Mera Ranangan agitation)

Mera Angan Mera Ranangan | भाजपच्या आंदोलनाबाबत अखेर एकनाथ खडसेंची भूमिका जाहीर

जळगाव, मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बिघडलेल्या वैद्यकीय व्यवस्थेचा आरोप करुन, बारा बलुतेदारांच्या मदतीसाठी भाजपने आज आंदोलन पुकारलं. (BJP Mera Angan Mera Ranangan agitation) ठाकरे सरकारविरोधात भाजपाने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला आहे. भाजपचे नेते राज्यभरात आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन उभे राहिले. (BJP Mera Angan Mera Ranangan agitation)

एकीकडे भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारविरोधात एल्गार पुकारला असताना, तिकडे नाराज नेते एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. खडसे रणांगणात उतरणार की नाही याची उत्सुकता सर्वांपेक्षा भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनाच होती. अखेर आज एकनाथ खडसे यांनी जळगावातील मुक्ताईनगरात आपल्या घरासमोर अंगणात उतरुन, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

वाचा : चंद्रकांत पाटील केसांना काळा कलप लावून अंगणातील रणांगणात उतरणार का? : सामना

एकनाथ खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगरातील कोथळी गावातील घरासमोर आंदोलन केलं. मोजके कार्यकर्ते आणि सोबत खासदार रक्षा खडसे यांनीही यावेळी या आंदोलनात सहभाग घेतला. ‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, पण उद्धव सरकार मात्र आपल्या घरात, कोरोना रोखण्यात पूर्ण निष्फळ उद्धव सरकारचा धिक्कार, कोरोनाचे संकट होतंय फारच गडद, गोरगरिबाला सोडले वाऱ्यावर, असे काही फलक घेऊन खडसे आणि कार्यकर्ते अंगणात उभे होते.

भाजपचे आंदोलन

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसंच हातावर पोट असणाऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. या मागण्यांसाठी भाजपने मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’ अशा प्रकारची भूमिका घेऊन आंदोलनाची हाक दिली.

या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

भाजपच्या नेमक्या मागण्या काय?

  • बारा बलुतेदारांसाठी पॅकेज जाहीर करा
  • शेतकऱ्यांना मदत द्या
  •  हातावर पोट असणाऱ्यांना सरकारने पॅकेज घोषित करा
  • आरोग्य व्यवस्था बळकट करा
  • रुग्णांना उपचार मिळण्याची व्यवस्था करा

(BJP Mera Angan Mera Ranangan agitation)

संबंधित बातम्या  

मुख्यमंत्र्यांची अपॉईंटन्मेट मिळवून द्या, ते ‘मातोश्री’मधून बाहेरच पडेनात : चंद्रकांत पाटील

मेरा आंगण, मेरा रणांगण, चंद्रकांत पाटलांचा नारा, भाजपचं 22 तारखेला ठाकरे सरकारविरोधात आंदोलन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *