तरुणी वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहिली, 71 लाख रुपये मिळणार

न्यूयॉर्कमधील एका कंपनीने वर्षभरापूर्वी हे चॅलेंज दिलं होते. इलाना मुगडेन (Elana Mugdan stays off her smartphone and win 71 lakhs) या महिलेने हे चॅलेंज जिंकले आहे.

तरुणी वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहिली, 71 लाख रुपये मिळणार
स्मार्टफोन वापरणाऱ्यांची ‘या’ बातमीने होणार निराशा
Follow us
| Updated on: Oct 07, 2019 | 5:19 PM

न्यूयॉर्क : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. एका क्लिकवर आपली काम करण्याची आपल्याला सवय लागली (Elana Mugdan stays off her smartphone and win 71 lakhs) आहे. आपण नेहमी फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिक-टॉक यासारख्या सोशल मीडियावर तासनतास वेळ घालवतो. पण तुम्ही जर स्मार्टफोनपासून वर्षभर दूर राहिलात, तर तुम्हाला 71 लाख रुपये (Elana Mugdan stays off her smartphone and win 71 lakhs) मिळू शकता.

न्यूयॉर्कमधील एका कंपनीने वर्षभरापूर्वी हे चॅलेंज दिलं होते. इलाना मुगडेन (Elana Mugdan) या महिलेने हे चॅलेंज जिंकले आहे. त्यामुळे तिला लवकरच 71 लाख रुपये मिळणार आहेत.

इलाना मुगडेन या महिलेने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात हे चॅलेंज स्विकारलं होते. Vitaminwater या पेय पदार्थ बनवणाऱ्या एका कंपनी या अनोख्या चॅलेंजचे आयोजन केले होते. Scroll Free for a Year असे या चॅलेंजचे नाव होते. जवळपास एक लाख लोकांनी या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी (stays off smartphone and win 71 lakhs) अर्ज केले होते. या सर्व अर्जांमध्ये केवळ 29 वर्षीय इलाना हिला हे चॅलेंज जिंकण्याची संधी मिळाली.

कंपनीने दिलेल्या चॅलेंजनुसार, तिला वर्षभरासाठी स्मार्टफोनचा वापर न करता राहावे लागणार होते. या बदल्यात तिला 1 लाख डॉलर (म्हणजेच 71 लाख रुपये) बक्षीस म्हणून देण्यात येतील असे सांगण्यात आले.

यानंतर इलानाकडून तिचा iPhone 5s स्मार्टफोन घेण्यात आला. याऐवजी त्यांना नियमित वापरण्यासाठी एक साधा फिचर फोन देण्यात आला. या फिचर फोनद्वारे इलाना फक्त फोन आणि मॅसेज करु शकत होती. येत्या डिसेंबर महिन्यात हे चॅलेंज पूर्ण होणार असून इलाना यांना बक्षीस म्हणून 71 लाख रुपये देण्यात येणार आहे.

मात्र ही रक्कम देण्यापूर्वी इलानाचे लाय-डिटेक्टर टेस्ट केले जाईल. हे टेस्ट येत्या फेब्रुवारी महिन्यात होईल अशी माहिती समोर येत आहे. जर ती या लाय-डिटेक्टर टेस्टमध्ये पास झाली, तर तिला बक्षिसाची संपूर्ण रक्कम मिळू शकेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.