बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची नियुक्ती, शासन निर्णय जारी

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली (Aaditya Thackeray Chairman of Balasaheb Thackeray Memorial) आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची नियुक्ती, शासन निर्णय जारी
Follow us
| Updated on: Mar 16, 2020 | 9:17 PM

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली (Aaditya Thackeray Chairman of Balasaheb Thackeray Memorial) आहे. नुकतंच सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, “दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या (Aaditya Thackeray Chairman of Balasaheb Thackeray Memorial)  स्मृती जपण्यासाठी मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी शिवाजी पार्क दादर मधील महापौर बंगला या जागेची निवड केली आहे. या स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार 27 सप्टेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्था स्थापन केली होती.”

“25 नोव्हेंबर 2019 च्या पत्रानुसार उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर 13 मार्च 2020 रोजी या अध्यक्षपदी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,” असे या निर्णयात नमूद केलं आहे.

तर न्यासाच्या सदस्य सचिवपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची वर्णी लागली आहे. त्याशिवाय शशिकांत प्रभू यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईतील महापौर निवासस्थानी भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे.

न्यासावरील अध्यक्ष आणि इतर सदस्यांचा प्रथम नियुक्तीचा तीन वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने पदसिध्द सदस्य वगळता अन्य सदस्यांची पदे भरण्याचे सरकारसमोर प्रस्तावित होते. त्यानुसार सरकारने नव्या नियुक्त्यांना मान्यता दिली (Aaditya Thackeray Chairman of Balasaheb Thackeray Memorial)  आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.