EPFO ची आकडेवारी, मार्चमध्ये तब्बल 8 लाख नोकऱ्या मिळाल्या!

मुंबई :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओने रोजगाराबाबत नवी आकडेवारी जाहीर केली आहे. ईपीएफओच्या मते, मार्च महिन्यात तब्बल 8 लाख 14 हजार नव्या नोकऱ्या मिळाल्या. हा आकडा फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत वाढला आहे. फेब्रुवारीत 7 लाख 88 हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला, असं ईपीएफओने म्हटलं आहे. एकंदरीत 2018-19 मध्ये तब्बल 67 लाख 59 हजार रोजगार दिल्याची …

EPFO data says 8.14 lakh jobs created in March 2019 Vs 7.88 lakh jobs in Feb 2019., EPFO ची आकडेवारी, मार्चमध्ये तब्बल 8 लाख नोकऱ्या मिळाल्या!

मुंबई :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओने रोजगाराबाबत नवी आकडेवारी जाहीर केली आहे. ईपीएफओच्या मते, मार्च महिन्यात तब्बल 8 लाख 14 हजार नव्या नोकऱ्या मिळाल्या. हा आकडा फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत वाढला आहे. फेब्रुवारीत 7 लाख 88 हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला, असं ईपीएफओने म्हटलं आहे. एकंदरीत 2018-19 मध्ये तब्बल 67 लाख 59 हजार रोजगार दिल्याची आकडेवारी ईपीएफओने जारी केली आहे.

22 ते 25 वर्षीय तरुणांना नोकरी

ईपीएफओच्या मते, मार्च 2019 मध्ये सर्वाधिक नोकऱ्या 22 ते 25 वर्षीय तरुणांना मिळाल्या. या वयोगटातील सव्वा दोन लाख तरुणांना मार्च महिन्यात नोकरी मिळाली. त्यानंतर 18 ते 21 वर्ष या वयोगटातील तरुणांना नोकऱ्या मिळाल्या.  आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये जानेवारी 2019 मध्ये सर्वाधिक 8.31 लाख नोकऱ्यां मिळाल्या.

नोकरीच्या संधी घटल्या

एप्रिल 2019 मध्ये जारी केलेल्या रोजगाराचे आकडे हे मार्च 2018 च्या तुलनेत घटल्याचे दिसते. ईपीएफओ ही संघटना कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा ताळेबंद ठेवते. जवळपास 6 कोटी कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. एप्रिल 2018 पासून ईपीएफओ नोकऱ्यांबाबतचे आकडे जारी करत आहे.

संबंधित बातम्या  

आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही   

1 एप्रिलपासून नवीन नियम लागू, घर खरेदी स्वस्त  

‘आधार’वरुन अवघ्या तीन दिवसात पीएफ काढणं शक्य! 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *