बेस्ट बसच्या खात्यात दिवसाला दोन कोटी चिल्लर, बेस्ट प्रशासनासमोर नवं आव्हान

मुंबई शहरातील प्रमुख ट्रान्सपोर्ट असणाऱ्या बेस्ट बससमोर (two crore Coins in Best Bus) आता एक नवी समस्या निर्माण झाली आहे.

बेस्ट बसच्या खात्यात दिवसाला दोन कोटी चिल्लर, बेस्ट प्रशासनासमोर नवं आव्हान
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 4:46 PM

मुंबई : मुंबई शहरातील प्रमुख ट्रान्सपोर्ट असणाऱ्या बेस्ट बससमोर (two crore Coins in Best Bus) आता एक नवी समस्या निर्माण झाली आहे. दररोज बेस्टच्या खात्यात मोठ्या प्रमाणात चिल्लर जमा होत आहेत. दिवसाला जवळपास दोन कोटी रुपयांचे चिल्लर बेस्टकडे जमा होत आहेत. तिकिटांच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांमध्ये 70 टक्के चिल्लरचा समावेश आहे, अशी माहिती बेस्टच्या (two crore Coins in Best Bus) अधिकाऱ्यांनी दिली.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट बसने काहीदिवसांपूर्वीच बेस्ट बसच्या तिकीत दरात घट केली. यानंतर बेस्ट बसने पाच रुपयांपासून तिकीट विक्रीस सुरुवात केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी बेस्ट बसमधून प्रवस करण्यास सुरुवात केली. बेस्ट बसकडे जमा होणारे सर्वाधिक चिल्लरही पाच रुपयांच्या तिकीटापासून मिळत आहेत, असंही बेस्टने सांगितले.

हे चिल्लर संभाळणे बेस्ट कर्मचाऱ्यांना कठीण होत आहे. दिवसाच्या शेवटी पैसे मोजून बँकेत जमा करताना बेस्ट कर्माचारी हैरान होत आहेत. नुकतेच सप्टेंबर 2019 मध्ये बेस्ट बसने चिल्लर मोजण्याची मशीनही मुंबईतील 27 डेपोंना दिली होती.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात पाचशे रुपयांचे चिल्लर

बेस्टकडे जमा झालेले चिल्लर कोणती बँक घेत नसल्यामुळे बेस्टनेही प्रत्येक कर्माचाऱ्यांच्या पगारात पाचशे रुपयांचे चिल्लर देण्यास सुरुवात केली आहे. बेस्टच्या तिकिट दरात घट झाल्यानंतर बेस्टकडे चिल्लरची संख्या वाढू लागली. कमीत कमी दोन किमी दूर जाण्यासाठी 5 रुपये, 8 रुपये, आणि 10 रुपये तिकीट निर्धारीत केली आहे.

जमा झालेल्या दहा कोटी चिल्लरच्या बदल्यात नोटा मिळणे अशक्य आहे. बेस्टकडून बँकेला तेरा वेळा चिट्टी लिहिण्यात आली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्रा, बँक ऑफ बरोदा आणि तीन कोऑपरेटिव्ह बँकेचा समावेश आहे. आता बेस्टने आरबीआयसोबत संपर्क साधला आहे. पण आरबीआयकडूनही अद्याप उत्तर मिळालेलं नाही, असं बेस्टने सांगितले.

“आम्ही आरबीआयच्या संपर्कात आहे. लवकरच समाधान मिळेल. जोपर्यंत यावर मार्ग मिळत नाही. तोपर्यंत प्रवाशांनी डिजीटल पेमेंट करावा”, अंस बेस्ट आयुक्त सुरेंद्र बागडे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.