पोलीस खासदार बनला, जुन्या सहकाऱ्यांना पाहताच सॅल्युट ठोकला!

हैदराबाद : लोकप्रतिनिधींना सलाम करण्यापासून ते स्वतःच खासदार होऊन सलाम स्विकारण्याचा प्रवास करणाऱ्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत हा नवनिर्वाचित खासदार आपल्या जुन्या वरिष्ठाना सलाम करताना दिसत आहे. हा फोटो आंध्रप्रदेशमधील पोलीस निरीक्षक गोरंतला माधव यांचा आहे. ते यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अनंतपूर जिल्ह्यातील हिंदापूर मतदारसंघातून खासदार …

, पोलीस खासदार बनला, जुन्या सहकाऱ्यांना पाहताच सॅल्युट ठोकला!

हैदराबाद : लोकप्रतिनिधींना सलाम करण्यापासून ते स्वतःच खासदार होऊन सलाम स्विकारण्याचा प्रवास करणाऱ्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत हा नवनिर्वाचित खासदार आपल्या जुन्या वरिष्ठाना सलाम करताना दिसत आहे.

हा फोटो आंध्रप्रदेशमधील पोलीस निरीक्षक गोरंतला माधव यांचा आहे. ते यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अनंतपूर जिल्ह्यातील हिंदापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. या फोटोत खासदार माधव आणि त्यांचे जुने वरिष्ठ गुन्हे शाखेचे उपाधीक्षक मेहबूब बाशा एकमेकांना पाहून आनंदाने सलाम करताना दिसत आहेत. यावेळी बाशा यांच्यासोबत इतर पोलीसही उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

माधव यांनी वायएसआर काँग्रेसकडून निवडणूक लढवताना तेलुगू देसम पक्षाचे विद्यमान खासदार क्रिस्तप्पा निम्मला यांचा 1 लाख 40 हजार 748 मतांनी पराभव केला.

संबंधित फोटो मतमोजणी सुरु असताना एका मतदान केंद्राच्या बाहेर घेण्यात आला होता. माध्यमांशी बोलताना माजी पोलीस अधिकारी आणि नवनिर्वाचित खासदार माधव म्हणाले, मी प्रथम माझ्या जुन्या वरिष्ठांना सलाम केला. मी त्यांचा आदर करतो. तो  सलाम आमच्या दोघांमधील परस्पर सामंज्यस्यातून केला होता.”

 पोलीस अधिकारी ते खासदार हा प्रवास कसा झाला?

माधव आणि टीडीपीच्या एका खासदारांमध्ये 2018 मध्ये हिंसाचारप्रकरणावरुन झालेल्या वादानंतर ते प्रथम चर्चेत आले. टीडीपी खासदारांनी पोलिसांना आर्वाच्च आणि गलिच्छ भाषेत बोलताना टीपण्णी केली. तेव्हा माधव यांनी संबंधित खासदाराला चांगलेच सुनावत असं बोलणाऱ्याची जीभ छाटू असे म्हटले होते. त्यानंतर माधव यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि राजकीय आखाड्यात उडी घेतली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *