खुनाचा साक्षीदार वकिलाचा कोट घालून न्यायालयात, शुभ संकेत असल्याचं म्हणत न्यायाधीशाच्या अंगावर बासरी फेकली

पोलिसांकडून न्यायालयात चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. असं असतानाही मुंबईत बोरीवली विभागातील दिंडोशी सेशन कोर्टात एक अजब घटना घडली (Fake Advocate in Dindoshi Court).

खुनाचा साक्षीदार वकिलाचा कोट घालून न्यायालयात, शुभ संकेत असल्याचं म्हणत न्यायाधीशाच्या अंगावर बासरी फेकली
Follow us
| Updated on: Jan 02, 2020 | 9:58 PM

मुंबई : न्यायालयात अनेक खटल्यांची सुनावणी होते. त्यासाठी पीडित, साक्षीदार, वकील यांच्यासह आरोपी देखील न्यायालयात येतात. म्हणूनच पोलिसांकडून न्यायालयात चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. असं असतानाही मुंबईत बोरीवली विभागातील दिंडोशी सेशन कोर्टात एक अजब घटना घडली (Fake Advocate in Dindoshi Court). कोर्ट क्रमांक 10 मध्ये वकिलाच्या वेशात येऊन एका व्यक्तीने थेट न्यायाधीशांच्या अंगावर लोखंडी बासरी फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर न्यायालयात एकच गोंधळ उडाला. ओमकार पांडे असं आरोपीचं नाव आहे.

आरोपी ओमकार पांडे याचं वय 60 वर्षे असून तो साकीनाका येथील रहिवासी आहे. त्याने आज (2 जानेवारी 2020) सकाळी 11 वाजता अचनाकपणे दिंडोशी न्यायालयाचे न्यायाधीश एस. यू. बघेले यांच्या अंगावर बासुरी फेकली. ही बासरी न्यायाधीशांना न लागता त्यांच्या शेजारील एका व्यक्तीला लागली. मात्र, यात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

आरोपीने श्रीकृष्णाचा वाढदिवस असल्यानं आपण न्यायाधीशांना बासरी भेट दिल्यासाठी म्हणून बासरी त्यांच्याकडे फेकल्याचा युक्तीवाद केला. विशेष म्हणजे हा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून खुनाच्या खटल्यातील साक्षीदार आहे.

आरोपी ओंकार पांडे 2017 मध्ये साकीनाका येथे झालेल्या खुनाचा साक्षीदार होता. त्याला न्यायालयाकडून वारंवार साक्षीसाठी बोलावण्यात येत होतं. मात्र, तो न्यायालयात हजर राहत नव्हता. अखेर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध समन जारी केलं. त्यानंतर ओमकार पांडे थेट वकिलाचा कोट घालून न्यायालयात अवतरला आणि न्यायाधीशांवर बासरी भिरकावली.

कुरार या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी ओंकार पांडेला अटक केली. कुरार पोलीस या प्रकरणांमध्ये अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.