जमिनीच्या वादातून शेतकऱ्याने तहसीलदाराला जिवंत जाळलं

जमिनीच्या वादातून तहसीलदार चेंबरमध्ये शिरुन शेतकऱ्याने विजया रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल उडवून पेटवलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याने तहसीलदाराला जिवंत जाळलं
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 11:51 AM

हैदराबाद : जमिनीच्या वादातून शेतकऱ्याने महिला तहसीलदाराला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार (Farmer burnt Tehsildar Alive) तेलंगणामध्ये उघडकीस आला आहे. जमीन तपशिलाबाबत महसूल नोंदीत दुरुस्ती केल्यामुळे वाद उफाळल्याची माहिती आहे.

तेलंगणाच्या रंगरेड्डी जिल्ह्यातील अब्दुल्लापूरमेट विभागाच्या तहसीलदार विजया रेड्डी यांच्यावर शेतकऱ्याने हल्ला केला. रेड्डी या सोमवारी दुपारी आपल्या चेंबरमध्ये बसल्या होत्या. अब्दुल्लापूरमेट विभागाच्या गोरेल्ली गावात राहणारा सुरेश नावाचा शेतकरी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तहसील कार्यालयात आला.

तहसीलदार चेंबरमध्ये शिरुन त्याने विजया रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल उडवून पेटवलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेत आरोपी सुरेशसह तहसीलदार विजया रेड्डी यांचा चालक आणि अन्य एक व्यक्तीही भाजली आहे. जखमींवर हयातनगर भागातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

रुग्णालयानेच रुग्णांना रस्त्यावर फेकलं, एकाचा मृत्यू

मयत तहसीलदार विजया रेड्डी यांच्या पश्चात पती आणि दोन मुलं आहेत. त्यांचे पती सुभाष रेड्डी हे पदवी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. विजया रेड्डी मूळच्या नालगोंडा जिल्ह्यातील मुनीक्कोडू मंडलम कलवालपल्ली गावच्या होत्या. त्यांनी 2009 मध्ये गट-2 मधून सरकारी नोकरीला सुरुवात केली होती.

सुरेशच्या जमिनीसंदर्भात खटला सुरु होता. जमीन तपशिलाबाबत महसूल नोंदीत दुरुस्ती केल्यावरुन दोघांमध्ये वाद (Farmer burnt Tehsildar Alive) सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.