VIDEO : तहानेने व्याकूळ नाग फणा काढून उभा, नागाची तहान शेतकऱ्याने भागवली

सांगली : उन्हाचा चटका फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही बसत आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्राण्यांसाठी तहान भागवणे कठीण होत आहे. त्यातूनच पाण्याविना अनेक प्राण्यांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. मात्र सांगलीतील एका शेतकऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवत पाण्यासाठी तडफडणाऱ्या नागाला पाणी देत जीवनदान दिले. त्यानंतर पाणी पिताना नागाचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. VIDEO …

, VIDEO : तहानेने व्याकूळ नाग फणा काढून उभा, नागाची तहान शेतकऱ्याने भागवली

सांगली : उन्हाचा चटका फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही बसत आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्राण्यांसाठी तहान भागवणे कठीण होत आहे. त्यातूनच पाण्याविना अनेक प्राण्यांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. मात्र सांगलीतील एका शेतकऱ्याने माणुसकीचे दर्शन घडवत पाण्यासाठी तडफडणाऱ्या नागाला पाणी देत जीवनदान दिले. त्यानंतर पाणी पिताना नागाचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

शिराळामधील  शिवनी मळ्यात दुपारच्या वेळी भर उन्हात एक नाग पाण्यासाठी तडफडत होता. हे दृश्य श्रीराम नांगरे पाटील या शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्यावेळी श्रीराम नांगरे पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हाने तडफडू लागलेल्या नागाला पकडून त्याच्या डोक्यावर पाणी ओतत शांत केले. त्यावेळी या नागाने पाणीही पिले. त्यानंतर नागाला पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले.

नागाला पाणी पिताना पाहणे हे तसे फार दुर्मिळ चित्र आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात नागाची पाण्यासाठी वनवन आणि शेतकऱ्याने दिलेले पाणी पिण्याची घटना याची परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे सांगलीत उन्हाचा मोठा फटका प्राण्यांनाही बसत असल्याचे समोर येत आहे.

यातून पुन्हा एकदा प्राण्यांसाठी उन्हाळ्यात पाण्याची सोय करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. वन्यप्राणी मित्रांकडूनही यासाठी काही ठोस उपाय योजनेची मागणी होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *