केवळ एका खासियतमुळे सोलापूरच्या मेंढ्याला चक्क साडेआठ लाखाची किंमत!

दुष्काळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकरी मेंढीपालनाचा व्यवसाय करतात. या व्यवसायातूनही आता लाखो रुपये कमवता येऊ शकतात, असं सोलापूरचे शेतकरी कलप्पा यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. 

sheep worth of 8 lakh 50 thosand rupees, केवळ एका खासियतमुळे सोलापूरच्या मेंढ्याला चक्क साडेआठ लाखाची किंमत!

सोलापूर : एका मेंढ्याने शेतकऱ्याला लखपती बनवलं आहे. हा मेंढा तब्बल साडेआठ लाख रुपयांना विकला गेला आहे (sheep worth of 8 lakh 50 thosand rupees). त्यामुळे या मेंढ्याच्या मालकाला प्रचंड आनंद झाला आहे. त्याने आपल्या नातेवाईक, मित्रपरिवारासोबत वाजतगाजत, गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात आपला आनंद साजरा केला आहे. या शेतकऱ्याचं नाव कलप्पा असं आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावाचा तो रहिवासी आहे.

मेंढीपालनाच्या व्यवसायातून इतके पैसे मिळतील असं कलप्पा यांना स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. शेजारच्या कर्नाटक राज्यातील विजापूरचे व्यापारी सोमनाथ मेलीनमनी यांनी हन्नूर गावी येवून साडेआठ लाख रुपयांना मेंढा खरेदी केला (sheep worth of 8 lakh 50 thosand rupees).

काय आहे खासियत?

मेंढीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या कलप्पा यांच्याकडे 35 मेंढ्या आहेत. येईल त्या भावाने ते मेंढ्यांची विक्री करतात. साठेआठ लाखाला विकला गेलेला मेंढा विजापुरी जातीचा आहे. साधारणत: तो दीड वर्षांचा आहे. त्याचे नाक पोपटाच्या आकाराचे आहे. त्यामुळे त्याची इतकी किंमत आहे.

दुष्काळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकरी मेंढीपालनाचा व्यवसाय करतात. या व्यवसायातूनही आता लाखो रुपये कमवता येऊ शकतात, असं कलप्पा यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.

दुष्काळामुळे शेतीत होणारं नुकसान टाळण्यासाठी कलप्पा यांनी मेंढीपालनाचा जोडव्यवसाय सुरु केला. मेंढीपालनातूनच घर चालवायचं, असं ध्येय कलप्पा यांनी निश्चित केलं होतं. अखेर त्यांच्या मेहनतीचं चीज झालं आणि त्यांना यश आलं. मेहनतीचं फळ उशिरा का असेना पण मिळतंच, हे आता कलप्पा यांच्याबाबतीत खरं ठरलं आहे. कलप्पा यांना आता त्याची प्रचितीदेखील आली आहे.

शेती किंवा शेतीच्या जोडव्यवसायातून काहीच मिळत नाही. त्यामुळे नोकरीच्या मागे लागणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे देशात बेरोजगारीची समस्या वाढत आहे. त्यातच या शेतकऱ्याने रोजगाराचा नवा मार्ग आत्मसात केला आहे. त्यामुळे त्याच्या व्यवसायाची आणि उत्पन्नाची परिसरात चांगलीच चर्चा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *