सात वर्षांच्या मुलाच्या बॅगमध्ये 7 लाखांच्या नोटा कुणाच्या? गूढ उकललं!

वसई : वैतरणा रेल्वे स्थानकात सात वर्षांच्या मुलाच्या बॅगमध्ये सापडलेल्या जवळपास 7 लाख रुपयांच्या नोटांचं गूढ उकललं आहे. मुलाजवळ सापडलेले 6 लाख 48 हजार 640 रुपये हे त्याच्या वडिलांच्या केटरिंगच्या व्यवसायाचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विरार रेल्वेस्टेशनजवळ 7 वर्षीय मुलाच्या बॅगेत 7 लाखांच्या नोटा नालासोपारा येथे राहणारे शब्बीर फय्याज अहम्मद अन्सारी यांचा केटरिंगचा […]

सात वर्षांच्या मुलाच्या बॅगमध्ये 7 लाखांच्या नोटा कुणाच्या? गूढ उकललं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

वसई : वैतरणा रेल्वे स्थानकात सात वर्षांच्या मुलाच्या बॅगमध्ये सापडलेल्या जवळपास 7 लाख रुपयांच्या नोटांचं गूढ उकललं आहे. मुलाजवळ सापडलेले 6 लाख 48 हजार 640 रुपये हे त्याच्या वडिलांच्या केटरिंगच्या व्यवसायाचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

विरार रेल्वेस्टेशनजवळ 7 वर्षीय मुलाच्या बॅगेत 7 लाखांच्या नोटा

नालासोपारा येथे राहणारे शब्बीर फय्याज अहम्मद अन्सारी यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. काल गुरुवारी शब्बीर  यांनी बांद्रा येथून आपल्या व्यवसायाचे पैसे घेऊन नालासोपाराला येत होते. 7 वर्षांचा नासिर हा मुलगा त्यांच्या सोबत होता. 6 लाख 48 हजार 640 एवढी रक्कम त्यांनी बांद्रामधून घेऊन, त्यानी मुलाच्या बागेत ठेवली होती. पण बागेत ठेवलेली रक्कम मुलाला माहीत नव्हती. या बाप-लेकानी बांद्रा येथून डहाणू लोकल पकडली होती. यांना विरारमध्ये उतरायचे होते. पण लोकलमधील गर्दीने बाप विरारला उतरला आणि मुलगा मात्र तसाच वैतरणाला गेला.

मुलगा वैतरणाला उतरल्याच्या नंतर रेल्वे स्थानकावर तुषार पाटील आणि मनीष रेकटे या तरुणाला भेटला होता. या दोन तरुणांनी त्या मुलाला आपल्या ताब्यात घेऊन सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन मुलांच्या सतर्कतेमुळे मुलागा आणि पैसे सुखरूप परत मिळाल्याने पोलिसांनी त्यांचे गुच्छ देऊन अभिनंदन केले आहे आणि पैसे आणि मुलाला त्याच्या आई वाडीलाच्या ताब्यात दिले आहे.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.