कोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार

कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी सर्वचजण आपआपल्या परीनं सहकार्य करत आहेत. बीडमधून 2 चिमुकलेही या मदतीच्या कामात उतरले आहेत (Beed children help to CM Relief Fund).

कोरोनाच्या लढाईत चिमुकलेही सरसावले, एकाकडून बक्षिसाचे तर दुसऱ्याकडून पॉकेट मनीतील प्रत्येकी 10 हजार
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 11:16 PM

बीड : कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी सर्वचजण आपआपल्या परीनं सहकार्य करत आहेत. बीडमधून 2 चिमुकलेही या मदतीच्या कामात उतरले आहेत (Beed children help to CM Relief Fund). यातील एकाने स्वतःला मिळालेल्या बक्षिसाची 10 हजार रुपयांची रक्कम, तर दुसऱ्याने पॉकेट मनीचे 10 हजार रुपये धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केलेत. गंगाधर धशे आणि संविधान दीपक गडसिंगे असं या मुलांचं नाव आहे. शासन-प्रशासनाची होणारी धावपळ आणि जनतेचा होणारा कोंडमारा पाहून हे चिमुकलेही या लढाईत उतरले आहेत. या संकटाच्या काळात या चिमुकल्यांनी दाखवलेल्या प्रगल्भपणाने त्यांचं जिल्ह्यात नागरिकांकडून चांगलंच कौतुक होत आहे.

कोरोनाच्या महाभयंकर संकटाने अगदी जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना आता अखंड मानव जात गिळंकृत करते की काय अशीच एकूण भीती तयार झाली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अवघे विश्व एकजुट झाले आहे. भारतातही कोरोनाने शिरकाव केला आहे. देशांतर्गत शासन-प्रशासन कोरोनाशी आपल्या ताकदीनिशी लढा देत आहेत. अशा स्थितीत लॉकडाऊन करुन सरकारने नागरिकांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाने भयावह स्थिती निर्माण केल्यानं नागरिकांचा कोंडमारा होऊन जीव गुदमरत आहे. परंतु अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून नागरिक त्यांना बळ देत आहे. हे पाहून बीड शहरातील चिमुकला गंगाधर धशे याने वाढदिवसासाठी जमा केलेला 10 हजार रुपये पॉकेटमनी आई अॅड. संगिता धशे, वडील अॅड. अनिल धसे आणि बहिणीच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे दिले. जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील चाटगावतील मजूर कुटुंबातील संविधान दीपक गडसिंगे यानेही त्याला मिळालेले बक्षिसाचे 10 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले.

बीडमधील या दानशूर चिमुरड्यांमुळे कोरोनाच्या लढाईला अधिक बळ मिळालं आहे. असं असलं तरी जिल्ह्यातील नागरिक मात्र कोरोनाविषयी आवश्यक गंभीर नसल्याचं दिसत आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन केलं जातं आहे. अनेक लोक अनावश्यक कामानिमित्त बाहेर फिरताना दिसतात. परिणामी हे संकट आपणच आपल्यावर ओढून घेत आहोत की, काय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही.

नागरिकांनी या संकटाच्या काळात घालून दिलेले नियम न पाळल्यास किंवा उल्लंघन करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे. नागरिकांनी या गंभीर परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

Beed children help to CM Relief Fund

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.