संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा

सीमा बंद असतानाही समुद्रमार्गे मुंबईतून चाकरमान्यांची वाहतूक करण्यात आली (Boat Transportation in Guhaghar during LockDown). या प्रकरणी वाहतूक करणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा
Follow us
| Updated on: Mar 26, 2020 | 8:23 PM

रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच वाहतूक सुरु आहे. मात्र असं असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांची बोटीतून वाहतूक होत असल्याचा प्रकार घडला आहे. या ठिकाणी सीमा बंद असतानाही समुद्रमार्गे मुंबईतून चाकरमान्यांची वाहतूक करण्यात आली (Boat Transportation in Guhaghar during LockDown). या प्रकरणी वाहतूक करणाऱ्या बोट मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.

पुढील काही दिवस कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळेच सरकारने या काळात नागरिकांनी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, असं असतानाही काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक आरोग्याला बाधा होईल, अशा कृती केल्या जात आहेत. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण देखील वाढतो आहे.

बुधवारी (25 मार्च) टीव्ही 9 मराठीने या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रकार उघड केला. यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत बोट मालकांवर गुन्हा दाखल केला. आता आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन, मेरीटाईम बोर्ड कायदा उल्लंघन, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेला कायदा उल्लंघन या कलमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोटचालकावर अधिकचे पैसे घेऊन प्रवाशांची वाहतूक केल्याचाही आरोप आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्जाचे 3 हफ्ते माफ करा, खासदार राहुल शेवाळेंची केंद्रीय अर्थमंत्र्याकडे मागणी

Corona Death | मुंबई आणखी एका महिलेचा मृत्यू, कोरोनाबाधित मृतांची संख्या 5 वर

आपल्याला लष्कराच्या मदतीची गरज येऊ नये ही सर्वांची जबाबदारी: अजित पवार

Boat Transportation in Guhaghar during LockDown

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.