लॉकडाऊनमध्ये मित्रांसोबत मार्निंग वॉकची हौस, नवी मुंबईत भाजप नगरसेवकावर गुन्हा

लॉकडाऊन सुरु असताना भाजप नगरसेवक आणि नवी मुंबई मनपाचे सभागृह नेते रवींद्र इथापे बेलापूर येथील पारसिक हिलवर मित्रांसोबत मार्निंग वॉक करत होते. (Navi Mumbai BJP Corporator Morning Walk)

लॉकडाऊनमध्ये मित्रांसोबत मार्निंग वॉकची हौस, नवी मुंबईत भाजप नगरसेवकावर गुन्हा

नवी मुंबई : राज्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी असतानाही मित्रांसोबत मार्निंग वॉक करण्याची हौस भाजप नगरसेवकाच्या अंगलट आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यासह 17 जणांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Navi Mumbai BJP Corporator Morning Walk)

नवी मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढत असताना नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. एकीकडे सरकार, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील असताना, लोकप्रतिनिधीच नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र आहे.

लॉकडाऊन सुरु असताना भाजप नगरसेवक आणि नवी मुंबई मनपाचे सभागृह नेते रवींद्र इथापे बेलापूर येथील पारसिक हिलवर काल (रविवार) आपल्या मित्रांसोबत मार्निंग वॉक करत होते.

मॉर्निंग वॉकची माहिती सीबीडी बेलापूर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते पथकासोबत तातडीने पारसिक हिल येथे पोहोचले. मॉर्निंग वॉक करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. एपीएमसी बाजार बंद ठेवण्यात आला आहे. सायंकाळी पाचनंतर शहरातील सर्व किराणा दुकान बंद ठेवण्यात येत आहेत. यासह महानगरपालिका आणि पोलिसांच्या वतीने नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे.

यापूर्वी पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांनी आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. नगरसेवकासह त्याच्या 11 साथीदारांवरही गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नव्हतं. तसंच जमावबंदी असताना एकत्र येणे, मास्क न घालणे इत्यादी गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत.

 

(Navi Mumbai BJP Corporator Morning Walk)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *