Corona | मोदींच्या लॉकडाऊन घोषणेनंतर फ्लिपकार्ट वेबसाईटही बंद

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं (Flipkart website close due to lockdown) आहे.

Flipkart website close due to lockdown, Corona | मोदींच्या लॉकडाऊन घोषणेनंतर फ्लिपकार्ट वेबसाईटही बंद

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं (Flipkart website close due to lockdown) आहे. याच पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टनेही आपल्या सर्व सेवा काही काळासाठी बंद केल्या आहेत. फ्लिपकार्ट वेबसाईटवर गेल्यास वेबसाईट काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा एक मेसेज येत आहे.

“काहीकाळासाठी आमच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आम्ही लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न करु. सध्या खूप कठीण परिस्थिती आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमच्या घरी राहा, बाहेर फिरु नका”, असा मेसेज फ्लिपकार्ट वेबसाईटवर येत आहे.

पंचप्रधान नरेंद्र मोदींनी काल (24 मार्च) संध्याकाळी पुढील 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊन असेल, अशी घोषणा केली. या लॉक डाऊन दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळतील. ज्यामध्ये किराणा, दूध, औषधांचा समावेश असेल. मोदींच्या या घोषणेनंतर रेल्वेनेही 14 एप्रीलपर्यंत सर्व रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रेल्वे सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार होती.

दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक कठोर निर्णय घेत आहे. एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असल्याने आता नागरिक रस्त्यावर उतरु शकत नाहीत. उतरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत मशिदीच्या मौलवीला कोरोना, तीन फिलिपिनी नागरिकांनाही संसर्ग

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन, सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *