अरुण जेटलींची पेन्शन गरजू चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना द्या, पत्नीची विनंती

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या पत्नीने त्यांची पेन्शन घेण्यास नकार दिला आहे (Sangeeta Jaitley declines MP pension). जेटलींची पत्नी संगिता जेटली यांनी राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून अरुण जेटली यांची पेन्शन राज्यसभेच्या त्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी ज्यांचा पगार कमी आहे, अशी विनंती केली. जेटलींच्या कुटुंबाला पेन्शन म्हणून …

Sangeeta Jaitley declines MP pension, अरुण जेटलींची पेन्शन गरजू चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना द्या, पत्नीची विनंती

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या पत्नीने त्यांची पेन्शन घेण्यास नकार दिला आहे (Sangeeta Jaitley declines MP pension). जेटलींची पत्नी संगिता जेटली यांनी राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून अरुण जेटली यांची पेन्शन राज्यसभेच्या त्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी ज्यांचा पगार कमी आहे, अशी विनंती केली. जेटलींच्या कुटुंबाला पेन्शन म्हणून जवळपास तीन लाख रुपये मिळणार आहे (Sangeeta Jaitley declines MP pension).

‘ज्या महान कार्याला अरुण जेटली करायचे, त्यांच्यांच मार्गावर चालत मी संसदेला विनंती करते की, एका स्वर्गीय खासदाराच्या कुटुंबाला मिळणारी पेन्शन त्या संस्थानच्या गरजू लोकांना दान करण्यात यावी ज्या संस्थानची जोटलींनी गेल्या दोन दशकांपासून सेवा केली (Sangeeta Jaitley declines MP pension). म्हणजेच राज्यसभेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी दिली जावी. मला विश्वास आहे की, अरुण यांचीही हिच इच्छा असती’, असं संगिता यांनी या पत्रात म्हटलं.

या पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवण्यात आली आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले अरुण जेटली यांचं वयाच्या 66 व्या वर्षी गेल्या 24 ऑगस्टला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते या रुग्णालयात अनेक दिवसांपासून अतिदक्षता विभागात भर्ती होते.

अरुण जेटली यांनी देशाचे अर्थ मंत्री हे महत्त्वपूर्ण पद सांभाळलं. त्याशिवाय ते राज्यसभेत विरोधीपक्ष नेतेही होते. त्यांची चार वेळी राज्यसभेचे सभासद म्हणून निवड झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली हे त्यांटचे अमूल्य मित्र असल्याचं सांगितलं होतं. ते एक असे नेते होते ज्यांचे केवळ पक्षातीलच नाही तर विरोधी पक्षातील नेतेही मित्र होते.

खासदाराला किती पेन्शन मिळते?

खासदारांच्या पगार आणि भत्ता कायद्यानुसार, माजी खासदारांना दरमहिन्याला किमान 20,000 रुपये पेन्शन मिळते, तसेच वर्षाला कुठल्याही सभागृहाचे सदस्य असलेल्यांना 1,500 रुपये पेन्शन पाच वर्षांपर्यंत मिळते. हे सर्व पकडून अरुण जेटलींना महिन्याला 50,000 पेन्शन मिळाली असती.

खासदारांच्या कुटुंबियांनाही दर महिना 25,000 रुपये पेन्शन मिळते, म्हणजेच वर्षाला 3 लाख रुपये. ही पेन्शन खासदाराच्या पती अथवा पत्नी किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांना मिळते. ही रक्कम खासदाराच्या पेन्शनच्या अर्धी असते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *