सेहवाग तुझ्या डोक्यावर जितके 'बाल', त्यापेक्षा जास्त माझ्याकडे 'माल' : शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागवर टीका केली आहे.

former pakistan fast bowler shoaib akhtar, सेहवाग तुझ्या डोक्यावर जितके ‘बाल’, त्यापेक्षा जास्त माझ्याकडे ‘माल’ : शोएब अख्तर

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागवर टीका केली आहे. “सेहवाग तुझ्या डोक्यावर जितके केसही नसतील तितके माझ्याजवळ पैसे आहेत”, असा घणाघात शोएब अख्तरने केला आहे (former pakistan fast bowler shoaib akhtar ). आता यावर सेहवाग काय उत्तर देतो, याकडे संपूर्ण देशाेचे लक्ष लागले आहे.

“माझे चाहते भारतातही आहेत. जेव्हा मी बांगलादेशात जातो तेव्हा फक्त मला बघण्यासाठी रस्त्यावर ट्रॅफिक जमा होते. ऑस्ट्रेलियात तर मी 10 सेकंदही एकटा राहू शकत नाही. त्यामुळे सेहवाग जेवढे तुझ्या डोक्यावर केसही नाहीत त्यापक्षा जास्त माझ्याजवळ पैसे आहेत”, अशा शब्दात शोएब अख्तरने (former pakistan fast bowler shoaib akhtar ) टीका केली.

शोएब अख्तरचं यूट्यूबवर अधिकृत चॅनल आहे. या चॅनलवर शोएब क्रिकेट संदर्भात विश्लेषण करत असतो. या विश्लेषणमध्ये शोएबने भारतीय खेळाडूंच्या कामाचे कौतुक केले होते. त्यावरुन भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने “शोएबला भारतात व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे तो भारतीय खेळाडूंची स्तुती करतोय”, असा टोला लगावला होता. त्यालाच आता शोएबने उत्तर दिलं.

खरंतर सेहवागचा व्हिडिओ जुना आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज जिंकल्यानंतर शोएबने भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं होतं. त्यामुळे तो व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. दरम्यान, “आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण क्रिकेटचं खरंखुरं विश्लेषण टाकतो. त्याचा काही लोकांना का त्रास होतोय? विराट कोहली हा भारतातला पहिला क्रमांकाचा खेळाडू आहे. भारतीय संघ जगात पहिला क्रमांकाचा आहे. हे खरं नाही का?”, असा सवाल शोएब अख्तरने केला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ समोरासमोर येतात तेव्हा तो दोन्ही देशांच्या नागरिकांचा अस्तित्वाचा प्रश्न बनतो. दोन्ही देशाचे खेळाडू एकमेकांशी अगदी तसेच वागतात. यातूनच खेळाडू एकमेकांना खुन्नस देण्याचे प्रकास सर्रासपणे बघायला मिळतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *