सांगलीकरांसाठी मोठा दिलासा, इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. इस्लामपूरमधील 4 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत (Sangli corona patient recovered).

सांगलीकरांसाठी मोठा दिलासा, इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

सांगली : राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. इस्लामपूरमधील 4 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत (Sangli corona patient recovered). सांगली आरोग्य विभागाने ते कोरोनामुक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे. इस्लामपूरमधील या चारही कोरोना बाधितांचे दुसऱ्या कोरोना चाचणीचे अहवाल आज मिळाले. यात त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. दुसऱ्यांदा त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्यानं सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शनिवारी (4 एप्रिल) या रुग्णांची पहिली कोरोना चाचणी निगेटीव्ही आली. त्यानंतर आज (5 एप्रिल) दुसऱ्यांदा त्यांची चाचणी निगेटीव्ही आली. असं असलं तरी खबरदारी म्हणून आणखी 2 ते 4 दिवस अजून या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच निरिक्षणाखाली ठेवले जाणार आहे. यानंतरच त्यांना घरी सोडलं जाईल. यासह आता सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 25 वरुन 21 वर आला आहे.

राजकीय पोळी भाजण्यासाठी कोरोनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न


दरम्यान, सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाला धार्मिक रंग देणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “कोरोना जात आणि धर्म बघून येत नाही. मात्र काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कोरोनालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमचं सरकार हे सर्वांसाठी एकच नियम लावत आहे.”

दरम्यान, महाराष्ट्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्णांचा आकडा 690 वर गेला आहे. तर राज्यातील ‘कोरोना’बळींची संख्या 36 वर पोहोचली आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 374 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 472 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई434923741417
पुणे (शहर+ग्रामीण)7961938356
पिंपरी चिंचवड मनपा5023411
ठाणे (शहर+ग्रामीण)
50523693
नवी मुंबई मनपा30018074
कल्याण डोंबिवली मनपा14449127
उल्हासनगर मनपा4069
भिवंडी निजामपूर मनपा199117
मिरा भाईंदर मनपा76315730
पालघर 17113
वसई विरार मनपा102810531
रायगड673526
पनवेल मनपा56525
नाशिक (शहर +ग्रामीण)473210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)165368
धुळे17720
जळगाव 781174
नंदूरबार 374
सोलापूर10324185
सातारा564322
कोल्हापूर 60726
सांगली126294
सिंधुदुर्ग7820
रत्नागिरी31425
औरंगाबाद16531484
जालना1542
हिंगोली 19310
परभणी731
लातूर 12583
उस्मानाबाद 9132
बीड491
नांदेड 1356
अकोला 6471433
अमरावती 26116
यवतमाळ 148221
बुलडाणा 7483
वाशिम 80
नागपूर6358411
वर्धा 901
भंडारा3700
गोंदिया 6610
चंद्रपूर2710
गडचिरोली3900
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)63018
एकूण74860323292587

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – एका रुग्णाचा मृत्यू – 5 एप्रिल

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, राज्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 36 वर

दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांची तातडीची बैठक, रात्री 9 च्या दरम्यान स्वतः लक्ष देणार

‘कोरोना’सोबत राज्यासमोर ‘हे’ प्रमुख आव्हान, उपमुख्यमंत्र्यांचं सुतोवाच, उपायही सुचवला

वर्ध्यात मजुरांची कामावरुन हकालपट्टी, कंपनीला 2 लाखांचा दंड

Sangli corona patient recovered

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *