लेटलतीफ कर्मचारीही सरळ, तुकाराम मुंढेंच्या शिस्तीने नागपूर मनपात 100 टक्के हजेरी

शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आगमनानंतर नागपूर महानगरपालिकेत मागील अनेक वर्षे जे कधी घडलं नव्हतं ते घडलं आहे.

लेटलतीफ कर्मचारीही सरळ, तुकाराम मुंढेंच्या शिस्तीने नागपूर मनपात 100 टक्के हजेरी

नागपूर : भारतीय प्रशासकीय सेवेतील शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आगमनानंतर नागपूर महानगरपालिकेत मागील अनेक वर्षे जे कधी घडलं नव्हतं ते घडलं आहे (Tukaram Mundhe Effect in Nagpur). तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून रुजु झाल्यानंतर महिनाभरातच कधीही वेळेत न येणारे कर्मचारी कारवाईच्या धाकानं वेळेत यायला लागले आहेत. महिनाभरात मनपा कर्मचाऱ्यांची हजेरी 60 टक्क्यांवरुन तब्बल 100 टक्क्यांवर गेली आहे.

नागपूर महानगरपालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांचा रोजचा दिनक्रम ‘केव्हाही या आणि वाट्टेल तेव्हा जा’ असाच होता. मात्र, 28 जानेवारीला तुकाराम मुंढे यांनी मनपा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. आता लेटलतीफ कर्मचारी साडेनऊच्या ठोक्याला कार्यालयात यायला लागले आहेत. त्यामुळेच महिनाभरातच नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची हजेरी 60 टक्क्यांवरुन 100 टक्क्यांवर गेलीय. हा तुकाराम मुंढे इफेक्ट असल्याचं मनपाचे कर्मचारी स्वत: मान्य करत आहेत.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे एक शिस्तप्रिय अधिकारी आहेत. थोडाही कामचुकारपणा ते खपवून घेत नाही. त्यामुळेच रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्तीचं पालन करण्याचे आदेश दिले. पहिल्या काही दिवसांत काही कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली, तर काहींना थेट निलंबित केलं. त्यामुळेच मनपाचे लेटलतीफ कर्मचारी वठणीवर आले. जे कर्मचारी कधीच वेळेत यायचे नाही, केव्हाही घरी जायचे, तेही आता वेळेत यायला लागले.

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापुर्वी, 23 जानेवारीपर्यंत मनपा कर्मचाऱ्यांची उपस्थिती सरासरी अवघी 41 टक्के होती, ती आता महिनाभरात 96 टक्क्यांवर गेली आहे. काही विभागात तर 100 टक्के हजेरी देखील झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यामुळेच मनपा कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती वाढल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या 100 टक्के हजेरीमुळे आता लोकांचीही कामं वेळेवर व्हायला लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.

Tukaram Mundhe Effect in Nagpur

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *