विखे पाटलांची आम्हाला अॅलर्जी नाही, गिरीश महाजनांकडून जाहीर ऑफर

अहमदनगर : काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. “आम्हाला कुणाचीही अॅलर्जी नाही. विखे पाटलांनी तिकिटाची मागणी केली, तर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेतला जाईल. आता कमळ हातात घ्यायचा का? हा विखे पाटलांचा व्यक्तीगत प्रश्न आहे”, असे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन […]

विखे पाटलांची आम्हाला अॅलर्जी नाही, गिरीश महाजनांकडून जाहीर ऑफर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:24 PM

अहमदनगर : काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. “आम्हाला कुणाचीही अॅलर्जी नाही. विखे पाटलांनी तिकिटाची मागणी केली, तर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेतला जाईल. आता कमळ हातात घ्यायचा का? हा विखे पाटलांचा व्यक्तीगत प्रश्न आहे”, असे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केलं.

गिरीश महाजन हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालूक्यात निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राम शिंदेही उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी दक्षिण नगरची जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे आता विखे पाटील भाजपात प्रवेश घेणार का? या चर्चेला उधाण आलं आहे.

“विखे पाटील यांनी भाजपाकडे तिकीटाची मागणी केली, तर त्यावर निर्णय घेतला जाईल. आता त्यांनी कमळ हातात घ्यायचा की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे”, असे महाजन म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गिरीश महाजनांनी सडकून टीका केली.

“शरद पवारांना सध्या पंतप्रधान पदाचे स्वप्न पडत आहेत. मात्र, गेल्यावेळी आम्हाला 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी  काँग्रेस राष्ट्रवादीचा पूर्णपणे सुपडासाफ होणार आहे, अनेकांचा बॅण्ड वाजणार आहे, त्यामुळे पवारांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार”, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.

“आघाडी सरकारमध्ये मधुकरराव पिचड मंत्री असताना अकोले तालूक्यात निळवंडे धरणाच्या कालव्यांचे भूसंपादन झाले. आता ही जागा सरकारच्या मालकीची असून कालव्यांच्या कामाला आडवे येऊ नका, ही दादागिरी चालणार नाही”, असा सूचक इशाराही गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या मधुकरराव पिचडांना दिला.

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.