मॅगीची दहा रिकामी पाकिटं द्या आणि एक मॅगी मोफत मिळवा

नवी दिल्ली : प्लास्टिक कचरा ही जागतिक समस्य़ा बनली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही प्लास्टिक बंदी  केली. असाच अनोखा उपक्रम ‘नेस्ले इंडिया’ने चालू करुन कंपनीने  आपला ब्रँड असलेल्या ‘मॅगी’ नूडल्ससाठी रिटर्न स्किम चालू केली आहे. या स्किममध्ये ग्राहकांनी 10 मॅगीचे रिकामे पाकिट दुकानात जाऊन जमा केले तर त्यांना एक मॅगीचे पाकिट मोफत मिळणार आहे. ही …

मॅगीची दहा रिकामी पाकिटं द्या आणि एक मॅगी मोफत मिळवा

नवी दिल्ली : प्लास्टिक कचरा ही जागतिक समस्य़ा बनली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही प्लास्टिक बंदी  केली. असाच अनोखा उपक्रम ‘नेस्ले इंडिया’ने चालू करुन कंपनीने  आपला ब्रँड असलेल्या ‘मॅगी’ नूडल्ससाठी रिटर्न स्किम चालू केली आहे. या स्किममध्ये ग्राहकांनी 10 मॅगीचे रिकामे पाकिट दुकानात जाऊन जमा केले तर त्यांना एक मॅगीचे पाकिट मोफत मिळणार आहे. ही स्किम सध्या देहरादून आणि मसूरी येथे सुरु करण्यात आली असून लवकरच इतर राज्यात सुरु करण्यात येणार आहे.

नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “ही स्किम ‘पायलट प्रोजेक्ट’च्या नावावर देहरादून आणि मसूरी येथे चालू केली आहे. येथील 250 रिटेलर्स सध्या याचा फायदा ग्राहकांना देत आहेत. यामागे कंपनीचे उद्दिष्ट प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण आणणे हे आहे”.

गती फाउंडेशन आणि उत्तराखंड पर्यावरण, सरंक्षण प्रदूषण कंट्रोल बोर्डच्या सयुंक्त अभ्यासातून समोर आलं आहे की, उत्तराखंडमध्ये सगळ्यात जास्त कचरा पसरवण्यामध्ये मॅगीसोबत पेप्सीको, लेज चिप्स आणि पारले फ्रुटी सारख्या प्रमुख ब्रॅंड्सच्या नावाचा समावेश आहे. ग्राहक ही पाकिटं कचरापेटीत न टाकता उघड्यावर फेकून देतात. नेस्लेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “आम्हांला पूर्ण विश्वास आहे, ग्राहकांमध्ये नक्कीच बदल होईल आणि त्यांना कचरापेटीत कचरा टाकण्याचे महत्त्व कळेल”.

नेस्ले इंडियाच्या पायलट प्रोजेक्टमधून जमा होणाऱ्या रिकाम्या पाकिटांची व्हिलेवाट लावण्याची जबाबदारी इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशनची असेल. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि उत्तराखंड राज्यात आधीपासूनच प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. यामुळे कंपनीने प्लास्टिकचा वापरही कमी केला आहे. पेप्सीको, कोका-कोला आणि बिस्लेरीने जुलै महिन्यात विकल्या जाणाऱ्या बाटल्यांवरती एक निश्चित किंमत (बाय बॅक) छापण्यासाठी सुरुवात केली होती. ज्याने प्लास्टिक कचऱ्यावर आळा बसेल.

आफ्रिकेतील 15 देशात सिंगल युज प्लास्टिक पूर्णपणे बंद आहे. 10% लोक चोरून वापरतात. आशियात बांगलादेश, चीन, कंबोडिया, हाँगकाँग, भारत (महाराष्ट्र, सिक्कीम, तामिळनाडू, गुजरात, उत्तराखंड), इंडोनेशिया, मलेशिया युरोपात डेन्मार्क, आयर्लंड (कर) आस्ट्रेलियाचा काही भाग, यूएस (कॅलिफोर्निया) येथे प्लास्टिकवर बंदी आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *