चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत सोने आणि परकीय चलन जप्त करण्यात आले. | gold smuggling
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Published On -
20:45 PM, 1 Dec 2020
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत सोने आणि परकीय चलन जप्त करण्यात आले.
एका व्यक्तीने चक्क पायातील स्लीपर्समध्ये जवळपास 20 तोळे सोने लपवून आणले होते.
ही व्यक्ती दुबईहून आली होती. कस्टम विभागाने सापळा रचून या व्यक्तीला ताब्यात घेतले. या व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्या स्लीपरमधून सोने आणि परकीय चलन जप्त करण्यात आले.
स्लीपरमधून 239 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत 12 लाख इतकी आहे.
तर सौदी अरेबियाच्या रियाल आणि अमेरिकन डॉलर्सच्या तब्बल 6.5 लाख रुपये मुल्याच्या नोटाही या व्यक्तीकडून जप्त करण्यात आल्या.