गूगलची व्हॉट्सअॅपसमोर माघार

मुंबई : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गूगलने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गूगल आपले मेसेजिंग अॅप अॅलो बंद करत आहे. हे अॅप गूगलने 2016 साली लॉन्च केलं होतं. पण हे अॅप हवी तेवढी लोकप्रियता मिळवण्यात कमी पडलं. ज्याचा तोटा गूगलला सहन करावा लागला. त्यामुळे आता हे अॅप बंद करण्याचा निर्णय गूगलने घेतला आहे. गूगलने …

गूगलची व्हॉट्सअॅपसमोर माघार

मुंबई : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गूगलने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गूगल आपले मेसेजिंग अॅप अॅलो बंद करत आहे. हे अॅप गूगलने 2016 साली लॉन्च केलं होतं. पण हे अॅप हवी तेवढी लोकप्रियता मिळवण्यात कमी पडलं. ज्याचा तोटा गूगलला सहन करावा लागला. त्यामुळे आता हे अॅप बंद करण्याचा निर्णय गूगलने घेतला आहे. गूगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये हे जाहीर केले. ‘अॅलो मार्च 2019 पर्यंत चालेल मग हे बंद होईल. तुम्ही तुमचे जुने कनव्हर्सेशन एक्सपोर्ट करु शकता’, असे गूगलच्या या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

‘अॅलोने आम्हाला खूप काही शिकवलं, विशेषकरुन मशीन लर्निंग आधारित फिचर्स आणि गूगल असिस्टेंटला मेसेजिंग अॅपमध्ये ईनबिल्ट करणे’, असेही गूगलने या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले.

एप्रिलपासूनच गूगलने अॅलोमध्ये गुंतवणूक करण्यास बंद केले होते, तसेच यामध्ये काम करणाऱ्या लोकांना इतर प्रोजेक्ट्समध्ये गुंतवले. या प्रोजेक्टच्या रिसोर्सला कंपनीने अँड्रॉईड मेसेज टीममध्ये शिफ्ट केले. यानंतरही कंपनीने या अॅपमध्ये काही फिचर्स दिले मात्र ते व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर सारख्या अॅपला टक्कर देऊ शकले नाही.

या अॅपच्या सुरुवातीला यात एंड टू एंड एनक्रिप्शन नसल्याने लोकांची निराशा झाली. गूगलने यात  व्हिडीओ कॉलिंग फिचरही दिलेला नव्हता. त्यामुळेही हा अॅप लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकला नाही.

कॉलिंग फिचरच्या कमतरतेमुळे हे अॅप व्हॉट्सअॅप आणि मेसेंजरच्या तूलनेत मागे पडले.

आता अखेर गूगलला हे अॅप बंद करावं लागत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *