रिक्षाचं भाडं आता गुगल मॅपवर पहा

नवी दिल्ली : गुगलने आपल्या यूझर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. आता गुगल मॅप यूझर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ मोडमध्ये ऑटो रिक्षाचं ऑप्शनही दिसणार आहे. या मोडला सिलेक्ट केल्यानंतर गुगल यूझर आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्याचा बेस्ट रुट तर बघू शकतीलच सोबतच ते रिक्षाचं भाडंही बघू शकणार आहेत. याने त्यांचा प्रवास आणखी सोयीस्कर होईल, असे गुगलने सांगितले. सध्या हे …

Google maps, रिक्षाचं भाडं आता गुगल मॅपवर पहा

नवी दिल्ली : गुगलने आपल्या यूझर्ससाठी एक खास फीचर आणले आहे. आता गुगल मॅप यूझर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ मोडमध्ये ऑटो रिक्षाचं ऑप्शनही दिसणार आहे. या मोडला सिलेक्ट केल्यानंतर गुगल यूझर आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्याचा बेस्ट रुट तर बघू शकतीलच सोबतच ते रिक्षाचं भाडंही बघू शकणार आहेत. याने त्यांचा प्रवास आणखी सोयीस्कर होईल, असे गुगलने सांगितले. सध्या हे फीचर फक्त दिल्लीपर्यंत मर्यादित आहे.

हा नवा फीचर गुगल मॅपमध्ये ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’च्या कॅब मोडमध्ये दिसेल. हा फीचर विशेषज्ञांनी सांगितलेले रस्ते आणि दिल्ली पोलिसांनी ठरवलेल्या अधिकृत भाड्यांवर आधारित असणार आहे.

गुगल मॅपचे प्रोडक्ट मॅनेजर विशाल दत्ता यांनी सांगितले की, ‘अनेकदा रस्ता माहित नसल्याने प्रवाशांना जास्त भाडे द्यावे लागते, कारण त्यांना बेस्ट रुट माहित नसते. या फीचरमुळे प्रवाशांना त्यांचा प्रवास अधिक सोयिस्कर बनवता येईल, त्यांना रिक्षाचे योग्य भाडे कळू शकेल, ज्यामुळे ते प्रवासासाठी योग्य निर्णय घेऊ शकतील.’

या फीचरचा वापर करण्यासाठी यूझर्सला गुगल मॅप्स अपडेट करावे लागणार आहे. मात्र हे फीचर इतर राज्यांत कधीपर्यंत येणार याबाबत गुगलने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *