तुमच्या प्रायव्हेट गोष्टी ऐकणारे 'हे' अॅप गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने पॉपुलर मेसेजिंग अॅप टूटॉकला (ToTok) पुन्हा एकदा प्ले स्टोअरमधून (Google remove totok app in play store) हटलवे आहे.

तुमच्या प्रायव्हेट गोष्टी ऐकणारे 'हे' अॅप गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले

मुंबई : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने पॉपुलर मेसेजिंग अॅप टूटॉकला (ToTok) पुन्हा एकदा प्ले स्टोअरमधून (Google remove totok app in play store) हटलवे आहे. या अॅपद्वारे संयुक्त अरब अमीरात (युएई) सरकारकडून लोकांवर लक्ष ठेवले जात होते, असा दावा केला जात आहे. यापूर्वीही या अॅपला डिसेंबरमध्ये अॅपल प्ले स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरमधून हटवले (Google remove totok app in play store) होते.

ज्यांनी हे अॅप इन्स्टॉल केले आहे. त्यांचा डेटा सुरक्षित नाही. कारण युएईकडून टूटॉक अॅपच्या माध्यमातून सर्वांवर नजर ठेवली जात आहे.

यामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्टी, हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय युजर्सच्या फोटो आणि इतर कॉन्टेटवरही लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.

हे अॅप टेलीग्राम आणि सिग्नल अॅपसारखे काम करते. या अॅपला मिडल ईस्ट, यूरोप, अशिया, अफ्रिका आणि उत्तरी अमेरिकामध्ये अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसवर लाखोवेळा डाऊनलोड केले आहे, असं अमेरिकेच्या गुत्पचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, टूटॉक अॅपला ब्रीज होल्डिंग नावाच्या एका कंपनीने तयार केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *