खाद्य महोत्सवाचं उद्घाटन, प्रमुख पाहुण्यांचं जेवण मात्र तारांकित हॉटेलमध्ये

वर्धा : वर्धा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वऱ्हाड महोत्सवा’चे (varhad food festival) आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे बुधवारी थाटात उद्घाटन झाले. या महोत्सवात खाद्य पदार्थांचे 30 स्टॉल आहेत. कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांना इथलेच भोजन दिले असते तर त्यात वेगळेपण दिसले असते. मात्र, तसे न करता पाहुण्यांना जेवणासाठी तारांकित हॉटेलमध्ये …

guest of varhad food festival had dinnet in five star hotel, खाद्य महोत्सवाचं उद्घाटन, प्रमुख पाहुण्यांचं जेवण मात्र तारांकित हॉटेलमध्ये

वर्धा : वर्धा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वऱ्हाड महोत्सवा’चे (varhad food festival) आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे बुधवारी थाटात उद्घाटन झाले. या महोत्सवात खाद्य पदार्थांचे 30 स्टॉल आहेत. कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांना इथलेच भोजन दिले असते तर त्यात वेगळेपण दिसले असते. मात्र, तसे न करता पाहुण्यांना जेवणासाठी तारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आले (varhad food festival).

महोत्सवाच्या उद्घाटनवेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना भेट म्हणून महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू देण्यात आल्या. मंचावरून ‘महिला बचत गटांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या वस्तू खरेदी करा, त्यांना व्यासपीठ द्या, उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्या’, अशा आशयाची भाषणेही झाली. मात्र, पाहुण्यांना भूक लागली तेव्हा त्यांना तारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आले.

विशेष म्हणजे वऱ्हाड महोत्सवात जळगावचे भरीत, झुणका भाकर, व्हेज पुलाव यासह गरम भजी आणि नॉनव्हेज सारखे अन्य पदार्थही होते. मात्र, यापैकी एकाही खाद्य पदार्थाची चव प्रमुख पाहुण्यांना चाखायला देण्यात आली नाही. निवडक पाहुणे मंडळीना महोत्सवातील जेवण कदाचित आवडले नसते म्हणून सरसकट सर्वच पाहुण्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आले. त्यामुळे बचतगटांना रोजगार मिळावा, बाजरपेठ उपलब्ध व्हावे, या हेतूलाच हरताळ फासला गेल्याचे बोलले जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *