कोरोनाशी दोन हात करण्याकरिता सामजिक संघटनांचा पुढाकार, 100 ठिकाणी 'हँडवॉश' सुविधा

वर्धा सोशल फॉरम या सामाजिक संघटनेने पुढाकार (Wardha Handwash Facility) घेत तब्बल 100 ठिकाणी हँड वॉश स्टेशनची निर्मिती केली आहे.

कोरोनाशी दोन हात करण्याकरिता सामजिक संघटनांचा पुढाकार, 100 ठिकाणी 'हँडवॉश' सुविधा

वर्धा : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत (Wardha Handwash Facility) आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आणि संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात गर्दीच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने 7 हँड वॉश स्टेशन तयार केले आहेत.

त्यानंतर वर्धा सोशल या सामाजिक संघटनेने पुढाकार (Wardha Handwash Facility) घेत तब्बल 100 ठिकाणी हँड वॉश स्टेशनची निर्मिती केली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी बाजारात कोणत्याही वस्तू घेण्यापूर्वी, प्रवास करण्यापूर्वी नागरिकांनी हात धुणे गरजेचे आहे.

यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, रुग्णलय, पेट्रोलपंप या ठिकाणी हे स्टेशन उभे केले आहेत. नागरिकांनी काळजी घेत याचा उपयोग करावा असे आवाहन वर्धा सोशलचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी केला आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 • पिंपरी चिंचवड – 12
 • पुणे – 11
 • मुंबई – 20
 • नागपूर – 4
 • यवतमाळ – 4
 • कल्याण – 4
 • नवी मुंबई – 3
 • अहमदनगर – 2
 • पनवेल – 1
 • ठाणे -1
 • औरंगाबाद – 1
 • रत्नागिरी – 1
 • उल्हासनगर – 1
  एकूण 65 (1 मृत्यू)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

 • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
 • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
 • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
 • नागपूर (1) – 12 मार्च
 • पुणे (1) – 12 मार्च
 • पुणे (3) – 12 मार्च
 • ठाणे (1) – 12 मार्च
 • मुंबई (1) – 12 मार्च
 • नागपूर (2) – 13 मार्च
 • पुणे (1) – 13 मार्च
 • अहमदनगर (1) – 13 मार्च
 • मुंबईत (1) – 13 मार्च
 • नागपूर (1) – 14 मार्च
 • यवतमाळ (2) – 14 मार्च
 • मुंबई (1) – 14 मार्च
 • वाशी (1) – 14 मार्च
 • पनवेल (1) – 14 मार्च
 • कल्याण (1) – 14 मार्च
 • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
 • औरंगाबाद (1) – 15 मार्च
 • पुणे (1) – 15 मार्च
 • मुंबई (3) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • यवतमाळ (1) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • मुंबई (1) – 17 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
 • पुणे (1) – 18 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
 • मुंबई (1) – 18 मार्च
 • रत्नागिरी (1) – 18 मार्च
 • मुंबई महिला (1) – 19 मार्च
 • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
 • अहमदनगर (1) – 19 मार्च
 • मुंबई (2) – 20 मार्च
 • पुणे (1) – 20 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
 • पुणे (2) – 21 मार्च
 • मुंबई (8) – 21 मार्च
 • यवतमाळ (1) – 21 मार्च
 • कल्याण (1) – 21 मार्च
 • एकूण – 65 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

 • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
 • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
 • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
 • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
 • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *