VIDEO : पोलिसांची महिलेला शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण

फरीदाबाद : पोलिसांनी एका महिलेल्या शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. या व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी पीडित महिलेला तिचा मोबाईल क्रमांक विचारत आहे, तर अन्य पोलीस कर्मचारी तिला पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओ हरियाणातील फरीदाबाद पोलिसांचा आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर …

VIDEO : पोलिसांची महिलेला शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण

फरीदाबाद : पोलिसांनी एका महिलेल्या शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. या व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी पीडित महिलेला तिचा मोबाईल क्रमांक विचारत आहे, तर अन्य पोलीस कर्मचारी तिला पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ हरियाणातील फरीदाबाद पोलिसांचा आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर हरियाणा पोलिसांवर चहुबाजूने टीका होत आहे. या प्रकरणी 5 पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी यातील आरोपी 2 हेड कॉन्स्टेबल आणि 3 विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

महिलेला पुरुष पोलीस कर्मचारी ताब्यात कसे घेऊ शकतात?

मारहाणीचा हा 4 मिनिटे 24 सेकंदाचा व्हिडीओ हरियाणातील वल्लभगड येथील आदर्श नगर पोलीस स्टेशनमधील आहे. यानंतर महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली. तसेच हा प्रकार लज्जास्पद असल्याचे म्हणत कारवाईची मागणी केली आहे. आयोगाने पोलीस आयुक्तांकडून या प्रकरणी माहिती मागितली आहे. तसेच एका महिलेला पुरुष पोलीस कर्मचारी पार्कमधून कसे घेऊन जाऊ शकतात याचीही विचारणा केली. महिलेला कोणत्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले होते आणि मारहाण का झाली, असेही प्रश्न आयोगाने उपस्थित केले.

पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी प्रकरण समोर येताच तत्काळ कारवाईचे आदेश दिले.  त्यानंतर अतिरिक्त पोलीस ठाणे प्रमुखांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हा व्हिडीओ ऑक्टोबर 2018 मधील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पीडित महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. महिला आयोग महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.

आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे
घटनेच्या दिवशी सायंकाळी पोलिसांना एक फोन कॉल आला. त्यात जवळील एका पार्कमध्ये एक महिला अश्लील वर्तन करत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळावर पोहचली. तेथे ही महिला सापडली. त्यानंतर तिला पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *