वडिलांनी छातीत लाथ मारल्याने 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा हकनाक जीव गेला आहे. भांडणामध्ये रागाच्या भरात मुलाच्या वडिलांनी चार वर्षीय मुलाच्या छातीत लाथ मारली. यामुळे चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार जळगाव येथील जामनेरमध्ये काल (28 मे) घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेश माळी असं मृत मुलाचे …

वडिलांनी छातीत लाथ मारल्याने 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा हकनाक जीव गेला आहे. भांडणामध्ये रागाच्या भरात मुलाच्या वडिलांनी चार वर्षीय मुलाच्या छातीत लाथ मारली. यामुळे चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार जळगाव येथील जामनेरमध्ये काल (28 मे) घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेश माळी असं मृत मुलाचे नाव आहे.

जामनेर येथील रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरमध्ये 30 वर्षीय विवाहीत महिला आपल्या पतीसह राहते. या जोडप्याला तीन मुली आणि चार वर्षाचा मुलगा महेश होता. काल दुपारी महेशचे वडील कैलास माळी आपल्या घरी आले. त्यावेळी महेशच्या हाताला पेनाची शाई लागली होती. महेशचा शाईने रंगलेला हात पाहिल्यानंतर वडिलांचा संताप झाला. त्यानंतर त्यांनी महेशच्या आईला हाताला शाई कशी लागली, तुझं लक्ष कुठे होतं अशी विचारणा केली. या कारणावरुन या दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. या भांडणाच्या रागात वडिलांनी चिमुकल्या महेशच्या छातीत लाथ मारली.

लाथ मारताच चार वर्षीय महेश जमिनीवर पडला. वडिलांनी छातीत लाथ मारल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यावेळी तातडीने शेजारी राहणाऱ्या महिलांनी महेशला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. महेशचा मृत्यू झाल्याची बातमी आईला कळताच तिने हंबरडा फोडला.

दरम्यान, संशयित आरोपी कैलास माळी हा घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *