Food | वजनासहित रक्तदाब कमी करण्यासाठी गुणकारी ‘बीट’, जाणून घ्या 10 फायदे!

बऱ्याच जणांना याची चव आवडत नसली तरी, याचे फायदे जर तुम्ही जाणून घेतलेत तर तुम्ही स्वतःला बीट खाण्यापासून थांबवू शकणार नाहीत.

Food | वजनासहित रक्तदाब कमी करण्यासाठी गुणकारी ‘बीट’, जाणून घ्या 10 फायदे!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:26 PM

मुंबई : ‘बीट’ हे एक कंदमूळ आणि गोडसर चवीची भाजी आहे. आपल्या पैकी अनेकांना बीटाची चव आवडत नाही. परंतु, बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या गुणधर्मांमुळे, त्याला ‘सुपरफूड’ देखील म्हटले जाते. बीटाचा रस देखील शरीराला अनेक प्रकारचे फायदेशीर ठरतो. वजन नियंत्रित करण्याबरोबरच रक्तदाब कमी करण्यातही बीट फायदेशीर ठरतो (Health Benefits of beetroot).

बऱ्याचदा सलाडमध्ये आपण बीटाचा वापर करून ते खातो. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे बीट (beetroot). बऱ्याच जणांना याची चव आवडत नसली तरी, याचे फायदे जर तुम्ही जाणून घेतलेत तर तुम्ही स्वतःला बीट खाण्यापासून थांबवू शकणार नाहीत. तुम्हाला जर नुसते बीट उकडवून खायला आवडत नसेल तर, तुम्ही त्याचे सलाड बनवून खाऊ शकता.

रक्तदाब कमी करते

बीटाचा रस उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. संशोधकांना असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज एक कप बीटाचा रस पितात त्यांच्यात सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी असतो. बीटाच्या रसामध्ये नायट्रेट असते जे रक्तप्रवाह सुरळीत करते. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

स्नायूंची शक्ती वाढवते

बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट असते जे शरीराच्या स्नायूंना मजबूत बनवते. 2015च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, बीटाचा रस प्यायल्यानंतर हृदयासंबंधित तक्रार असणाऱ्यांमध्ये 2 तासांत स्नायूंची ताकद 13 टक्क्यांनी वाढली (Health Benefits of beetroot).

डिमेंशियावर प्रभावी

बीटाचा रस डिमेंशिया या आजारावर खूप प्रभावी आहे. 2011च्या अभ्यासानुसार, बीटामध्ये असणारे नायट्रेट वृद्धांच्या मेंदूत रक्त प्रवाह वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे स्मरणशक्ती सुव्यवस्थित राहते.

वजन नियंत्रित करते

बीटाच्या रसामध्ये कॅलरी कमी असतात आणि फॅट मुळीच नसते. त्यामुळे या रसाच्या सेवनाने वजन वाढीवर नियंत्रण मिळवता येत. बीटाच्या रसाने आपल्या दिवसाची सुरुवात केल्याने आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते.

कर्करोगाचा प्रतिबंध करते

बीटाच्या रसात बीटालाईन नावाचे अँटीऑक्सिडेंट असते. 2016च्या एका संशोधनानुसार, बीटालीनचे केमो-प्रतिबंधात्मक असून, कर्करोगाच्या पेशींचा प्रसार होण्यापासून रोखतात (Health Benefits of beetroot).

पोटॅशियमचा चांगला स्रोत

बीटाच्या रसात पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. जे नसा आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतो. बीटचा रस योग्य प्रमाणात पिण्यामुळे शरीरात पोटॅशियमची पातळी चांगली राहते. शरीरात पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि स्नायू दुखीचा त्रास होतो. पोटॅशियम कमी झाल्यास हृदयरोगाचा धोका देखील वाढतो.

खनिजांचा चांगला स्रोत

बीटाच्या रसात लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम, जस्त, तांबे आणि सेलेनियम असते. ही सर्व खनिजे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि दात व हाडे निरोगी ठेवतात.

फोलेटची चांगली मात्रा

फोलेटची कमतरता न्युरोल ट्यूब दोष आणि स्पाइना बिफिडा सारख्या आजारांना कारणीभूत ठरते. गर्भवती महिलांमध्ये फोलेटच्या कमतरतेमुळे अकाली प्रसूती होण्याचा धोका वाढतो. बीटाच्या रसामध्ये फोलेटची चांगली मात्रा आढळते (Health Benefits of beetroot).

यकृत ठीक ठेवतो

अनियमित जीवनशैली, जास्त प्रमाणात मद्यपान आणि अधिकचे जंक फूड खाण्याने यकृताचे नुकसान होते. बीटामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे यकृतामध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात. तसेच यकृताला हानिकारक घटकांपासून वाचवतात.

कोलेस्टेरॉल कमी करते

कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांनी बीटाच्या रसाचा रोजच्या आहारात समावेश करावा. बीटाच्या रसात फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.

(Health Benefits of beetroot)

टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.