LIVE :मुंबईत जोरदार पाऊस, हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा दमदार बँटिंग (Mumbai rain) सुरु केली आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे.

LIVE :मुंबईत जोरदार पाऊस, हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा दमदार बँटिंग (Mumbai rain) सुरु केली आहे. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच वसई विरारमध्ये महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला आहे. त्याशिवाय सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

LIVE UPDATE

Picture

दादर, हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी

03/09/2019,5:35PM
Picture

विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

नागपुर- – विदर्भात पुढचे दोन दिवस मुसळाधार पावसाचा अंदाज, विदर्भाच्या बऱ्याच भागात आज संततधार पाऊस, पुढचे पाच-सहा दिवस विदर्भात पाऊस कायम राहणार, नागपूर हवामान विभागाचं भाकीत

03/09/2019,5:08PM
Picture

वरळीत अनेक ठिकाणी पाणी साचलं

#MumbaiRain – मुंबईसह उपनगरात जोरदार #पाऊस, वरळीत रस्त्यावर पाणी साचलं

03/09/2019,5:03PM
Picture

वरळीत रस्ते तुंबले

03/09/2019,5:05PM
Picture

कल्याण-कसारा दरम्यान डाऊन मार्गावर रेल्वे वाहतूक उशिरा

कल्याण आणि कसारा दरम्यान रेल्वे वाहतूक उशिरा, डाऊन मार्गावर दहा मिनिटांनी रेल्वे वाहतूक उशिरा

03/09/2019,8:37AM
Picture

मुसळधार पावसामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी ओसरली

मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे, आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे, लालबागच्या राजाच्या चरणी येणाऱ्या भक्तांना या पावसाचा फटका बसत आहे, भाविकांची गर्दी ओसरल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे, मात्र जे दुरुन आले आहेत, ते मात्र पावसात भिजत राजाच दर्शन घेत आहेत.

03/09/2019,8:07AM
Picture

दादर, हिंदमाता परिसरात मुसळधार पाऊस

मुंबईत सततच्या पावसामुळे अनेक सखल भागात दादर, हिंदमाता, माटुंगा या ठिकाणी पाणी साचले आहे.

03/09/2019,8:03AM
Picture

मुंबईत रात्रभर पावसाची संततधार

मुंबईत रात्रभर पावसाची संततधार, सातांक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत 30 ते 40 मिमी पावसाची नोंद

03/09/2019,8:03AM
Picture

पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे.

03/09/2019,8:00AM
Picture

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

सततच्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.

03/09/2019,7:58AM
Picture

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस

सोमवारी रात्रीपासून मुंबईत लालबाग, परळ, दादर, माटुंगा या ठिकाणी मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले.

03/09/2019,7:57AM

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *