ग्रामीण मुलांसाठी होमस्कूलिंग, 70 विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब, ‘थिंकशार्प फाऊंडेशन’चा स्तुत्य उपक्रम

ग्रामीण भागातील मुलांकडे संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन, या सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्यांना शिक्षकांशी जोडता येत नाही.

ग्रामीण मुलांसाठी होमस्कूलिंग, 70 विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब, 'थिंकशार्प फाऊंडेशन'चा स्तुत्य उपक्रम
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 8:29 PM

पुणे : ‘कोव्हिड – 19’चा जागतिक स्तरावर परिणाम झाला; (Home School Project By ThinkSharp Foundation) प्रत्येक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रावरही प्रचंड परिणाम झाला आहे. परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवलेली आहेत. मुलं शाळा, मित्र, शिक्षक, भविष्य या सगळ्याची चिंता सोडून घरात बसून आहेत आणि ही परिस्थिती ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच विद्यार्थ्यांना भासत आहे. परंतु ग्रामीण भागातील शिक्षणावर जास्त परिणाम झाला आहे. कारण, ग्रामीण भागातील विद्यार्थी हे जास्त प्रमाणात सरकारी शाळांवर अवलंबून असतात. याशिवाय, त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, यावर त्यांना ऑनलाईन शिक्षण मिळेल की नाही हे अवलंबून आहे (Home School Project By ThinkSharp Foundation).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ग्रामीण भागातील मुलांकडे संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन, या सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्यांना शिक्षकांशी जोडता येत नाही. याशिवाय, त्यांना सेमिनार, वेबिनर, ऑनलाईन क्लास याचा फायदा ही घेता येत नाही आणि भविष्यात जरी शाळा चालू झाल्या तरीही संपुर्ण अभ्यासक्रम पूर्ण होणं अवघड आहे.

ग्रामीण शाळेला होमस्कूल प्रकल्पात काय दिले जाईल?

थिंकशार्प फाऊंडेशनने हा उपक्रम जि. प. शाळा, गोह्रे बु. पुणे येथे चालू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत थिंकशार्प फाऊंडेशन चौथी ते आठवी मधील 70 विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅबलेट देणार आहे. या टॅबलेटमुळे विद्यार्थी शिक्षकांना जोडले जाणार आहेत, ऑनलाईन क्लासचा उपभोग घेऊ शकणार आहेत. याव्यतिरिक्त या टॅबमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त 1500 पुस्तके आणि इतर शैक्षणिक अ‍ॅप असणार आहेत. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण घेता येणार आहे.

ग्रामीण शाळेत होमस्कूलिंगचा प्रथम प्रयोग

या शाळेतील होतकरु शिक्षक रजनीकांत मेंढे यांनी अथक प्रयत्न करुन मुलांना झूम अ‍ॅपद्वारे शिक्षण चालू ठेवले. परंतु सर्व मुलांकडे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय नसल्यामुळे भरपूर अडचणी येत होत्या. परंतु, ज्यांच्याकडे ही सुविधा होती त्यांचा उत्साह आणि शिकण्याची आवड पाहून आम्हाला हा उपक्रम करण्याची प्रेरणा मिळाली (Home School Project By ThinkSharp Foundation).

“होमस्कूल प्रोजेक्ट”- बदलत्या शिक्षणाचं भवितव्य

थिंकशार्प फाऊंडेशनने प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु केला असला तरी जर कोरोनाची परिस्थिती बदलली नाही, तर उरलेल्या ग्रामीण शाळांनाही होमस्कूलिंग करण्याचा आमचा मानस आहे. थिंकशार्प फाऊंडेशनच्या ग्रामीण शाळेचा परिपूर्ण विकास होण्यासाठी आम्ही “स्टडीमॉल” उपक्रमाच्या माध्यमातून 50 शाळांना डिजीटल लर्निंग, लायब्ररी, संगणक मित्र इत्यादी गोष्टींची मदत केली गेली आहे. (संस्थेबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://thinksharpfoundation.org/#home )

होमस्कूलिंगचे फायदे आणि वैशिष्ट्ये :

• विद्यार्थी घरुन शिकत राहतात

• विद्यार्थ्यांना मल्टिमिडीयाच्या स्वरुपात संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासता येईल

• वापरकर्त्यांसाठी अनुकूल तंत्रज्ञानामुळेच विद्यार्थी टॅब सहज वापरण्यास सुरुवात करतील.

• ग्रामीण शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सोडती रोखली जाईल

• या संपूर्ण उपक्रमात विद्यार्थी व्यस्त राहतील आणि शिक्षकांशी जोडले जातील

स्टडीमॉल उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरु राहिलच याशिवाय त्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वाढत्या वापरासाठी ते तयार होतील. याचबरोबर त्यांचा तंत्रज्ञानाविषयी आत्मविश्वास निर्माण होईल आणि उच्चशिक्षणासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

Home School Project By ThinkSharp Foundation

संबंधित बातम्या :

Shivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.