एअरटेलच्या 28 दिवसांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी अशी वाढवा

मुंबई : जीओच्या एंट्रीमुळे प्रत्येक सिमकार्ड कंपनीला फटका बसला आहे. यातच प्रत्येक कंपनी आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन प्लॅन बाजारात आणत आहे. यंदा एअरटेलने युजर्ससाठी हटके असा प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅननुसार युजर्स आता कोणत्याही प्लॅनची वैधता 28 दिवसांपेक्षा अधिक वाढवू शकतो. मात्र यासाठी तुम्हांला 23 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. तसेच प्लॅनची वैधता जरी संपली तरी तुमची इनकमिंग आणि आऊटगोईंग …

, एअरटेलच्या 28 दिवसांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी अशी वाढवा

मुंबई : जीओच्या एंट्रीमुळे प्रत्येक सिमकार्ड कंपनीला फटका बसला आहे. यातच प्रत्येक कंपनी आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन प्लॅन बाजारात आणत आहे. यंदा एअरटेलने युजर्ससाठी हटके असा प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅननुसार युजर्स आता कोणत्याही प्लॅनची वैधता 28 दिवसांपेक्षा अधिक वाढवू शकतो. मात्र यासाठी तुम्हांला 23 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. तसेच प्लॅनची वैधता जरी संपली तरी तुमची इनकमिंग आणि आऊटगोईंग सुविधा चालू राहिल असं कंपनीने म्हटलं आहे.

आतापर्यंत सर्व टेलीकॉम कंपन्यांनी ज्यामध्ये भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि टाटा डोकोमोचा समावेश आहे, या कंपन्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा वापर केला आहे. कंपनीने हा निर्णय यासाठी घेतला आहे की, सरासरी कमाईवर युजर वाढवता येतील असं सांगितलं जात आहे.

टेलीकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार जे युजर्स पैसे देत नाही, त्यांनाही या प्लॅनचा फायदा होणार आहे. रिपोर्टनुसार एअरटेल आणि वोडाफोन कंपनीने तीन नवीन सर्वात कमी किंमतीच्या प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 35, 65 आणि 95 रुपयांच्या रिचार्जचा समावेश आहे. एअरटेलचे रिचार्ज तुम्ही एअरटेलच्या अॅपवर जाऊनही पाहू शकता.

याआधी स्मार्ट रिचार्जमध्ये 25 रुपयाचा सर्वात स्वस्त प्लॅन होता. ज्यामध्ये टॉक टाईम, रेट कटिंग बेनिफिट्स आणि डेटा प्लॅनची सुविधा दिली जात होती. मात्र आता हा प्लॅन फक्त 28 दिवसांची वैधता वाढवणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *