अमित ठाकरेच्या लग्नाची मला पत्रिकाच दिली नाही, जानकर नाराज

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे याचा मुंबईत अत्यंत शाही विवाहसोहळा पार पडला. कला, क्रीडा, राजकारण, उद्योग इत्यादी नाना क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत, अमित आणि मिताली या जोडप्याला आशीर्वाद दिले. मात्र, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांना निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आळले असून, त्याबाबत जानकर …

amit thackeray, अमित ठाकरेच्या लग्नाची मला पत्रिकाच दिली नाही, जानकर नाराज

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे याचा मुंबईत अत्यंत शाही विवाहसोहळा पार पडला. कला, क्रीडा, राजकारण, उद्योग इत्यादी नाना क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत, अमित आणि मिताली या जोडप्याला आशीर्वाद दिले. मात्र, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांना निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आळले असून, त्याबाबत जानकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

अमित ठाकरेच्या लग्नाबद्दल मला माहितीच नाही. मला पत्रिका मिळाली की, मी शुभेच्छा द्यायला जाईन, असे म्हणत महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमित ठाकरेंचा शाही विवाहसोहळा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण विवाहबद्ध झाले. यांचा विवाहसोहळा लोअर परेल येथील सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो

या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अमितच्या लग्नाला हजर होते. त्यामुळे लग्नसोहळ्यात ठाकरे कुटुंबीयांचे राजकारणापलिकडचे सहृदयी नातेही पाहायला मिळाले. किंबहुना, उद्धव ठाकरेंची उपस्थिती सर्वांच्याच चर्चेचा विषय होता.

अमित ठाकरेच्या लग्नाची संपूर्ण बातमी : अमित-मिताली विवाहबद्ध, दिग्गजांची उपस्थिती

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *