Tukaram Mundhe : नागपूरकरांनो सोशल डिस्टंसिंग पाळा, तरच आपण हे युद्ध जिंकू : तुकाराम मुंढे

रस्त्यावरील बेघर नागरिक असतील, मजूर असतील, स्थलांतरीत नागरिक असतील, या सर्वांना आपण अन्न आणि निवारा पुरवण्याचं काम करत आहोत.

Tukaram Mundhe : नागपूरकरांनो सोशल डिस्टंसिंग पाळा, तरच आपण हे युद्ध जिंकू : तुकाराम मुंढे
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 9:36 PM

नागपूर : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस (Tukaram Mundhe Exclusive On Corona) वाढ होत चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार गेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मुख्य शहरांमध्ये कठोर पावलं उचलली जात आहेत. नागपूर शहरातही मोठे निर्णय घेतले जात आहेत. धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे कठोर निर्णय घेत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नागपुरात काय काय उपाययोजना करण्यात आली आहे याबाबत (Tukaram Mundhe Exclusive On Corona) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जे निर्णय घेण्याची गरज आहे, ते घेतले जात आहेत. त्यावर 100 काम सुरु आहे. जे कोणी पॉझिटिव्ह पेशंट येतात. त्यांना आम्ही क्वारंटाईन करत आहोत. जेणेकरुन त्यांचा कुणाशीही संपर्क येणार नाही आणि कोरोना पसरणार नाही. ज्या टीम्स बनवलेल्या आहेत, त्या 14 दिवस क्वारंटाईन केलेल्या प्रत्येक घरी जात आहेत आणि त्यांची तपासणी करत आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणं आहेत की नाही याची विचारपुस केली जात आहेत. त्या माहितीच्या आधारे जर वाटलं तर त्या रुग्णाला लगेट क्वारंटाईन करुन पुढील कारवाई केली जात आहे”, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

“शहरात 500 टीम्स आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करत आहोत. नागपुरात 38 वॉर्ड आहेत, तिथे आरआरटी स्थापन करण्यात आल्या आहेत. 10 झोनल मेडिकल अधिकाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्या माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन काम करत आहेत. तसेच, जो अॅप तयार केला आहे. त्याच्यावरुन काही माहिती मिळत आहे. त्यानुसार आपण काम करत आहोत”, असंही ते म्हणाले.

“आज काय झालं, उद्या काय करायचं आहे, काय स्थिती आहे, यासर्वांवर चर्चा करण्यासाठी आम्ही वॉर रुम तयार केली आहे. या वॉर रुममध्ये रात्री 10च्या आसपास मी आणि माझे सहकारी चर्चा करतो. पुढील कार्य ठरवतो”, अशी माहिती तुकाराम मुंढे त्यांनी दिली.

“रस्त्यावरील बेघर नागरिक असतील, मजूर असतील, स्थलांतरीत नागरिक असतील, या सर्वांना आपण अन्न आणि निवारा पुरवण्याचं काम करत आहोत. यामध्ये सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग आहे. आरोग्य तपासणी आणि सानिटायझेशन नागपूर महापालिकेतर्फे होत आहे. आम्ही एकत्र याला लढा देत आहोत. त्यामुळे माझी नागरिकांना ही विनंती आहे की, अजूनही बरेच नागरिक रस्त्यावर भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना नागरिकांनापर्यंत पोहोचवण्याची सुविधा केली आहे. (Tukaram Mundhe Exclusive On Corona) मात्र, तरीही काहीजण अजिबात सोशल डिस्टंसिंग पाळत नाही. त्यामुळे मला विनाकरण ते भाजी मार्केट जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे ते बंद करावा लागतील. माझी विनंती आहे, आपल्याला हव्या असलेल्या अत्यावश्यक गोष्टी या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, तास उपलब्ध आहेत, त्यामुळे कृपया गर्दी करु नका, सोशल डिस्टंसिंग पाळा. आपण या कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करु”, अशी विनंती तुकाराम मुंढे यांनी केली.

“शासनाकडून मरजकमधील 275 लोकांची लिस्ट मिळाली आहे. त्यातील 100 नागरिकांपर्यंत आपण पोहोचलो आहेत, त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.”

“नागपूर शहरात 16 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, त्यापैकी 4 हे बरे होऊन घरी गेले आहेत तर 12 हे जीएमसीमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. त्यांचती प्रकृती स्थिर आहे.”

“आम्ही प्रयत्न करत आहोत, पण नागरिकांची साथ गरजेची आहे. सोशल डिस्टंसिंग पाळा, आवश्यक असल्यास घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावं. सोशल डिस्टंसिंग पाळून भाजी किंवा इतर वस्तू खरेदी कराव्या. 14 एप्रिलपर्यंत जर आपण हे तंतोतंत पाळलं, तर यावर मात करणे शक्य आहे”, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना केलं.

नागपुरातील रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहेत, वाहनं जप्त केली जात आहेत. ही लढाई फक्त प्रशसनाच्या माध्यमातून नाही तर यामध्ये नागरिकांना 100 टक्के प्रसिसाद दिला तरच जिंकता येईल. जर आपण घरी राहलो तर आपण हे युद्ध जिंकू. आरोग्य यंत्रणा सर्व सज्ज आहे. त्याशिवाय त्यांना आवश्यक ते ट्रेनिंग दिले आहे. अनेक जण तुमच्यासाठीघराबाहेर आहे. मात्र काही जण हे मुद्दाम घराबाहेर पडतात. त्यांनी घरात राहा”, अशी विनंती तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe Exclusive On Corona) यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.