तुकाराम मुंढे यांचा धडाकेबाज एक महिना!

तुकाराम मुंढेंनी नागपूर मनपा आयुक्त पद सांभाळल्यापासून कर्मचारी वेळेत कार्यालयात येऊ लागले. कामं वेळेवर होऊ लागली, कर्मचाऱ्यांना शिस्त लागली.

तुकाराम मुंढे यांचा धडाकेबाज एक महिना!

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात दबंग आयएएस म्हणून ओळखले जाणाऱ्या आयएएस तुकाराम मुंढे (IPS Tukaram Mundhe One Month) यांनी नागपूरचे महानगर पालिका आयुक्त (Nagpur Municipal Corporation Commissioner) म्हणून एक महिना पूर्ण केला. या महिन्यात तुकाराम मुंढेंनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. तुकाराम मुंढेंनी नागपूर मनपा आयुक्त पद सांभाळल्यापासून कर्मचारी वेळेत कार्यालयात येऊ लागले. कामं वेळेवर होऊ लागली, कर्मचाऱ्यांना शिस्त लागली.

तुकाराम मुंढे यांनी 27 जानेवारीला नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार (PS Tukaram Mundhe One Month) स्वीकारला होता. महिनाभरात तुकाराम मुंढे यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. अनियमितता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला, अतिक्रमण हटवलं, गँगस्टर संतोष आंबेकरचा बंगला पाडला, असे अनेक निर्णय महिनाभरात तुकाराम मुंढे यांनी घेतले.

तुकाराम मुंढेंचे धडाकेबाज निर्णय

 • मनपाच्या चार कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस
 • कंत्राटदार जे. पी. एंटरप्रायजेस काळ्या यादीत
 • गँगस्टर संतोष आंबेकरचा अवैध बंगला तोडला
 • मनपाचे कर संग्राहक आनंद फुलझलेला केलं निलंबित
 • शहरातील अवैध आठवडी बाजारांवर मोठी कारवाई
 • हिवताप निरिक्षक संजय चमके बडतर्फ
 • सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाईमुळे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना नोटीस
 • शहरातील रोजचे 120 पाणी टँकर बंद
 • बैठकीत मोबाईल वाजायला नको
 • मनपा कार्यालयात जिन्सला बंदी
 • प्लास्टिक उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारवाई
 • आर्थिक टंचाईमुळे मंजूर विकास कामांना स्थगिती
 • कर्मचाऱ्यांना शिस्त, हजेरी 100 टक्क्यांवर

तुकाराम मुंढेंच्या महिन्याभरातील कामाचा हा थोडक्यात परिचर आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयांनी त्यांनी संपूर्ण महिना गाजवला.

आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी मनपा कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. कुठल्याही परिस्थितीत अनियमितता खपवून न घेतल्यानं, लेटलतीफ कर्मचारी वेळेवर कार्यालयात यायला लागले. याचा कामांवरंही परिणाम व्हायला लागला. सर्वसामान्यांची कामं वेळेत व्हायला लागली. याचं मनपातील सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्ष काँग्रेसचे नगरसेवक स्वागत करतात. पण, तुकाराम मुंढे यांनी आर्थिक कारणं देत मंजूर विकास कामांना स्थगिती दिल्याने, सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहीम, तुकाराम मुंढे यांनी जोरात राबवली. गँगस्टर संतोष आंबेकरचा बंगलाही पाडण्यात आला. अवैध आठवडी बाजार बंद झाले. पण, या महिनाभराच्या कारवायांमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली.

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं.

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं.

नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.

नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली. त्यानंतर गेल्या महिन्याच्या (PS Tukaram Mundhe One Month) अखेरीस त्यांची नागपूर मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली.

संबंधित बातम्या :

लेटलतीफ कर्मचारीही सरळ, तुकाराम मुंढेंच्या शिस्तीने नागपूर मनपात 100 टक्के हजेरी

तुकाराम मुंढेंची डॅशिंग कारवाई, गँगस्टर आंबेकरचा अनधिकृत बंगला पाडला

तुकाराम मुंढेंकडून 108 नगरसेवकांना भेटण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ, बसायला खुर्चीही नाही, भाजप नगरसेवक नाराज

दुसऱ्याच दिवशी ‘फैसला ऑन द स्पॉट’, तुकाराम मुंढेंचा चार कर्मचाऱ्यांना दणका!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *