रायुडूची निवृत्ती : जेव्हा ICC नेच BCCI ला विचारलं होतं रायडूची निवड का नाही?

विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केला आहे केला आहे.

रायुडूची निवृत्ती : जेव्हा ICC नेच BCCI ला विचारलं होतं रायडूची निवड का नाही?
credit ICC
Follow us
| Updated on: Jul 03, 2019 | 2:37 PM

मुंबई : विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड न झालेल्या नाराज अंबाती रायुडूने धक्कादायकरित्या क्रिकेटला अलविदा केला आहे. अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकटेला गुडबाय केलं आहे. रायडूच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वन डे विश्वचषकासाठी (ICC World Cup 2019) भारतीय संघात (Indian squad for Cricket World Cup 2019) रायुडूचा समावेश न झाल्याने तो नाराज होता.  मात्र रायुडूचा समावेश न झाल्याने आयसीसीही चकीत होती.

कारण इन फॉर्म खेळाडू असलेल्या रायुडूला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. रायुडूचा सध्याचा फॉर्म पाहता त्याची टीम इंडियात निवड होईल असा विश्वास अनेकांना होता. मात्र भारतीय निवड समितीने रायुडूचा 15 जणांच्या भारतीय संघात समावेश केला नाही.

त्यावेळी आयसीसीने स्वत: भारतीय खेळाडूंची 20 सामन्यातील सरासरी काढली होती. त्यात विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मानंतर, अंबाती रायुडूचा नंबर लागतो. तसेच रायुडू हा सरासरीत मास्टर ब्लास्टर सचिनच्या पुढे आहे. विराट कोहली 59.57, महेंद्रसिंह धोनी 50.37, रोहित शर्मा 47.39, अंबाती रायुडू 47.05  आणि सचिन तेंडुलकरची सरासरी 44.83 इतकी आहे, अशी आकडेवारी आयसीसीने अधिकृत ट्विटरवर शेअर केली होती. तसेच त्याची विश्वचषकासाठी निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं.

त्यावेळी “रायुडूला भारताच्या वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं आहे. तुम्हाला वाटत नाही का त्याचा समावेश व्हायला हवा होता?” असेही त्यांनी म्हटलं होतं. आयसीसीच्या या ट्विटरवर अनेकांनी हो आणि नाही अशा संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.आयसीसीच्या या ट्विटनंतर अनेकांनी बीसीसीआयच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहलीही रायुडू चौथ्या नंबरसाठी फिट असल्याचे सांगितले होते.

या कारणामुळे रायुडूची निवृत्ती? 

दरम्यान यंदाच्या विश्वचषकासाठी 15 जणांची भारतीय टीमची घोषणा केली, त्यावेळी रायडूला राखीव खेळाडू म्हणून टीममध्ये संधी देण्यात आली होती. मात्र विश्वचषकात शिखर धवन आणि  विजय शंकर या दोन खेळांडूंना दुखापत झाल्यानतंर बीसीसीआयने मयांक अग्रवाल आणि रिषभ पंत यांची निवड करत त्यांना इंग्लंडला बोलवले. याच कारणामुळे तो नाराज असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली होती. दरम्यान रायडूने निवृत्तीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण तो आयपीएल खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या : 

अंबाती रायुडूची धक्कादायक निवृत्ती, नाराज रायुडूचा क्रिकेटला अलविदा!

….म्हणून पंतऐवजी दिनेश कार्तिकची वर्ल्ड कपसाठी निवड!   

ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर  

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.