मोदी पुन्हा जिंकल्यास संन्यास घेणार, कर्नाटकच्या मंत्र्याची घोषणा

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून जिंकल्यास आणि पुन्हा पंतप्रधान झाल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी घोषणा कर्नाटकचे सार्वाजनिक बांधकाम मंत्री आणि जनता दलाचे (सेक्युलर) वरिष्ठ नेते एच. डी. रेवन्ना (HD Revanna) यांनी केली. ते म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सत्तेत येणार नाही, असाही विश्वास व्यक्त केला. रेवन्ना हे जनता दलाचे (सेक्युलर) प्रमुख …

मोदी पुन्हा जिंकल्यास संन्यास घेणार, कर्नाटकच्या मंत्र्याची घोषणा

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून जिंकल्यास आणि पुन्हा पंतप्रधान झाल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी घोषणा कर्नाटकचे सार्वाजनिक बांधकाम मंत्री आणि जनता दलाचे (सेक्युलर) वरिष्ठ नेते एच. डी. रेवन्ना (HD Revanna) यांनी केली. ते म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सत्तेत येणार नाही, असाही विश्वास व्यक्त केला.

रेवन्ना हे जनता दलाचे (सेक्युलर) प्रमुख एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे मोठे भाऊ आहेत. म्हैसूर येथे बोलताना त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सी. एच. विजयशंकर यांचा प्रचार केला. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने (भाजप) विद्यमान खासदार प्रताप सिम्हा यांना निवडणुकीत उतरवले आहे.

धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी

रेवन्ना म्हणाले, “संयुक्त पुरोगामी आघाडीला (UPA) पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आणि धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी आमच्या पक्षाने काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी केली आहे. यातून आम्हाला देशभरातील शेतकऱ्यांच्या हिताचेही रक्षण करायचे आहे.”

“मोदींनी मागील 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केले हे मला माहिती आहे. राज्य सरकारने 15 लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने’चा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारकडे यादी पाठवली आहे. मात्र मोदी ती यादीच मिळाली नसल्याचे म्हणत आहेत. हे पूर्ण खोटे आहे,” असेही रेवन्ना यांनी यावेळी नमूद केले.

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *