KBC 11 : केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी ‘या’ प्रश्नाचं उत्तर द्या

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘कौण बनेगा करोडपती’चा (KBC) 11 वा सीझन लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहिला प्रश्न जनतेला विचारला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर देत तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन KBC मध्ये करु शकता. एका व्हिडीओच्या माध्यमातून बच्चन […]

KBC 11 : केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी 'या' प्रश्नाचं उत्तर द्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘कौण बनेगा करोडपती’चा (KBC) 11 वा सीझन लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पहिला प्रश्न जनतेला विचारला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर देत तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन KBC मध्ये करु शकता. एका व्हिडीओच्या माध्यमातून बच्चन यांनी हा प्रश्न जनतेला विचारला आहे. सोनी टीव्हीच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमधील अमिताभ बच्चन यांचा पहिला प्रश्न

“संस्कृत भाषेतून निर्माण झालेल्या यापैकी कोणत्या नावाचा अर्थ ‘स्वागत करणे’ असा होतो?”

ए. नचिकेत

बी. अभिनंदन

सी. नरेंद्र

डी. महेंद्र

“आता तुमच्या आणि हॉट सिटमध्ये अंतर राहणार नाही. कारण यावर्षीच्या केबीसी शोचे रजिस्ट्रेशन आता सुरु झाले आहे. यंदाच्या रजिस्ट्रेशनचा हा पहिला प्रश्न आहे. जर या प्रश्नeचे तुम्हाला योग्य उत्तर येत असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारे उत्तर देऊ शकता किंवा सोनी लिव्हच्या अॅपवरही उत्तर देऊ शकता”, असं सोनी टीव्हीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

एसएमएसद्वारे उत्तर द्या

एसएमएसद्वारे सहभाग घेण्यासाठी यूजर्सला आपल्या एसएमएसमध्ये KBC लिहावे लागेल आणि स्पेस देऊन तुमचे वय लिहावे लागेल. यानंतर एक स्पेस देऊन तुम्हाला परुष किंवा स्त्री असं लिहावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 25 वर्षाचे आहात, तर तुम्हाला KBC 25 M असं लिहावं लागेल आणि 509093 वर सेंड करावं लागेल.

अॅप्लिकेशनद्वारे प्रश्नाचे उत्तर

अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सोनी लिव्ह अॅप डाऊनलोड करावा लागेल. यामध्ये केबीसीचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर योग्य उत्तर देऊन केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावे लागेल.

रात्री 9 वाजता उत्तर द्यावे लागणार

या प्रश्नाचे उत्तर आज (गुरुवारी) रात्री 9 वाजेपर्यंत द्यावे लागणार आहे. जर 9 नंतर तुम्ही योग्य उत्तर दिले, तर तुमचे उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्ही योग्य उत्तर दिले, तर भाग्यवान विजेता कौण बनेगा करोडपतीमधील हॉट सीटवर पोहचेल.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.