दक्षिण मुंबईला अनधिकृत बांधकामाचा विळखा, सर्वसामान्य रहिवाशांचा बळी

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत बांधकामाचा बळी सर्वसामान्य रहिवाशी (illegal construction in Mumbai) ठरत आहे. नुकतंच दक्षिण मुंबईमध्ये एका दहा मजली इमारत अनधिकृत असल्याची नोटीस देत घर खाली करण्याची नोटीस देण्यात आली.

दक्षिण मुंबईला अनधिकृत बांधकामाचा विळखा, सर्वसामान्य रहिवाशांचा बळी
Follow us
| Updated on: Sep 22, 2019 | 11:18 PM

मुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत बांधकामाचा बळी सर्वसामान्य रहिवाशी (illegal construction in Mumbai) ठरत आहे. नुकतंच दक्षिण मुंबईमध्ये एका दहा मजली इमारत अनधिकृत असल्याची नोटीस देत घर खाली करण्याची नोटीस देण्यात आली. गुलिस्तान अपार्टमेंट असे या इमारतीचे नाव आहे. या इमारतीवर जर ही कारवाई करण्यात आली, तर त्यात राहणाऱ्या सर्व कुटुबियांवर (illegal construction in Mumbai) रस्त्यावर राहण्याची वेळ येणार आहे.

गेल्या 74 वर्षांपासून इब्राहिम उमर हे गुलिस्तान अपार्टमेंट पहिल्या मजल्यावर राहतात. त्यांची बायपास सर्जरी झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी पायऱ्या जास्त चढू नये असा निर्देश दिला आहे. पण इमारत तोडण्याची नोटीस देण्यात आल्याने त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे.

गुलिस्तान अपार्टमेंट ही इमारत डोंगरी  पायधुनीमध्ये इस्माईल कारटे रोडवर आहे. या इमारतीला पालिकेच्या सी वॉर्डतर्फे नोटीस दिली गेली. या गुलिस्तान अपार्टमेंट ही दहा मजली इमारत अनधिकृत आहे. या इमारतीत राहणाऱ्या सर्व रहिवाशांना मनपा अधिनियम 1888 अंतर्गत कलम 488 अन्वये नोटीस दिली आहे. ही इमारत लवकरात लवकर रिकामी करण्यास सांगितलं असून उद्यापासून हा इमारतीवर हातोडा पडणार आहे. अशी सूचना पालिकेने या रहिवाशांना दिली आहे.

या नोटीशीनंतर अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इमारत अनधिकृत असली तरी यात आमची काहीही चूक नाही. आमची फसवणूक झाली आहे आणि आम्ही कुठे जाणार. आमच्या समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा आम्हाला पर्यायी घर देण्यात यावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

दक्षिण मुंबईमध्ये अनधिकृत बांधकाम हे काही नवीन नाही. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे की ही इमारत जेव्हा बांधली जात होती, तेव्हा मनपा आणि पोलिसांनी याबाबत कारवाई का केली नाही. तसेच ज्या बिल्डरने या अनधिकृत इमारतीचे बांधकाम केले. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत स्थानिक आमदार अमीन पटेल आणि नगरसेवक आकाश पुरोहित यांना प्रश्न विचारला असता, तर ते दोघेही बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जर गुलिस्तान इमारतीवर कारवाई झाली तर त्यामध्ये राहणारे कुटुंबीय कुठे जाणार, त्यांच्या भवितव्याचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.