महाराष्ट्राला खुशखबर! उद्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता

नागपूर : उन्हाने लाहीलाही झालेल्या महाराष्ट्रासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारपासून विदर्भ आणि कोकणात, तर 1 तारखेपासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानंतर 2 जूनला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात अजून मान्सून पूर्व पाऊसही न आल्याने शेतकऱ्यांसह …

महाराष्ट्राला खुशखबर! उद्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता

नागपूर : उन्हाने लाहीलाही झालेल्या महाराष्ट्रासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारपासून विदर्भ आणि कोकणात, तर 1 तारखेपासून राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानंतर 2 जूनला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात अजून मान्सून पूर्व पाऊसही न आल्याने शेतकऱ्यांसह प्रत्येक जण पावसाची वाट पाहतोय. त्यात मुंबईसह राज्यभरात नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. पण आयएमडीच्या अंदाजामुळे आता पावसाच्या आगमनाची उत्सुकता ताणली आहे. 3 आणि 4 जूनलाही राज्याच्या काही भागात पूर्व मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. या पावसानंतर उकाडा कमी होण्यास मदत होईल.

विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. चंद्रपुरात 48 डिग्रीपर्यंत तापमान नोंदवण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक जण पावसाची वाट पाहतोय. मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झालाय. पण पुढील वाटचाल संथ झाल्याने महाराष्ट्रातील आगमनही 15 दिवसांनी लांबलंय. गडचिरोलीमध्ये दोन दिवसांपूर्वी अचानक ढगाळ वातावरण झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कहर सुरु आहे. पण पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *